आधिकाऱ्यांच्या माध्यमातून हिंगे यांच्या घराभोवती षडयंत्र रचणारा खरा सुत्रधार शोधा - बाळासाहेब गायकवाड
◻️ आश्वी बुद्रक येथे शनिवारी कडकडीत बंद, निषेध मोर्चा व सभा संपन्न
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची आश्वी बुद्रक येथे भेट : पोलीस अधिक्षकाशी करणार चर्चा
◻️बांधकाम कामगार योजनेतील बेवारस १० पेट्याचा प्रशासनाकडून पंचनामा
संगमनेर LlVE | नुकत्याचं झालेल्या ग्रामपचायत निवडणुकीनंतर सत्ता न मिळलेल्या विरोधाकांनी षडयंत्र रचत सामाजिक काम करणाऱ्या विजय हिंगे यांच्या घरामागील ऊसात बांधकाम कामगार योजनेतील पेट्या टाकून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांच्या जागृत व एकीमुळे तलाठ्यासह तपासणी करणारे आधिकारी तत् मम् करत बसले, यामागील सुत्रधार १५ दिवसात शोधा अन्यथा पोलिस स्टेशन समोर सर्व ग्रामस्थ अमरण उपोषण करणार असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी दिला.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रक येथील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय साहाय्यक विजय हिंगे यांच्या नेतृत्वाखालील नुकत्याच झालेल्या ग्रामपचायत निवडणुकीत विजयी झाल्याने जिव्हारी लागलेल्या विरोधाकांनी षडयंत्र रचत हिंगे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाल्याने सर्व ग्रामस्थ एकत्र येत दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी निषेध सभा घेण्यात आल्याचे बोलले जात असून या निषेध सभेतून आश्वी व परिसरातून आलेल्या लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी रिपाईचे जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विजय हिंगे, कॉग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, माजी संरपच महेश गायकवाड, उपसंरपच राहुल जऱ्हाड, किशोर जऱ्हाड, रिपाई (गवई) जिल्हाध्यक्ष किशोर वाघमारे, उंबरी बाळापूरचे माजी ग्रामपंचायत सदस्य विजय शेळके, संतोष ताजणे, गणेश गायकवाड, बाळासाहेब बिहाणी, नवनाथ आंधळे, डॉ. संजय सांगळे, संतोष नागरे, संजय कोल्हे, भाऊसाहेब खेमनर, अनिल भुसाळ, प्रशांत कोळपकर, अमोल त्रिभुवन, दिलावर शेख, शिबलापूर संरपच प्रमोद बोंद्रे, जालिंदर बोंद्रे आदीसह शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी बाळासाहेब गायकवाड पुढे म्हणाले की, गलिच्छ राजकारण करुन प्रामाणिकपणे सामाजिक काम करणाऱ्या तरुणावर खोटे आरोप करणे म्हणजे आपल्या बालिशपणाचे प्रदर्शन करु नका ग्रामपचायती मधून काय मिळते? राजकारणात हार - जीत चालू रहाते. ज्याला हार पचवंत नाही त्यांनी गलिच्छ राजकारणातून खोटे नाटे प्रयोग करु नये हवे असेल तर नूतन संरपचासह ही नविन इमारत सुद्धा तुम्हाला घ्या मात्र प्रामाणिक माणसाला बदनाम करु नका !
आधिकाऱ्यांच्या माध्यमातून हिंगे यांच्या घराभोवती जे षडयंत्र रचन्यात आले ते राजकिय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना आहे. वयोवृद्ध महिलेला जाणून - बुजुन त्रास देण्यात आल्याने ग्रामस्थ सुद्धा आज एकत्र आल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.
यावेळी विजय हिंगे म्हणाले की, आजपर्यत मी प्रामाणिक काम केले. गोरगरिबांचा पैसा खाऊन मी मोठा होणार नाही. लोकांचा विश्वास व दिशा असल्याने माझ्या हातात पुन्हा ग्रामपचायत दिली. यातुन मी लोकांचा विश्वासघात करणार नाही मात्र, मी केलेल्या प्रामाणिक कामाला छेद लावण्याकरिता या ना त्या मार्गाने प्रयोग होत आहे. आता लोकांनी ही ओळखल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान शनिवारी गावातील व्यापार्यासह, शेतकरी, तरुणांनी एकत्र येत उस्फुर्तपणे निषेध व्यक्त करत गाव कडकडीत बंद ठेवले होते. तर या पेट्या कोठून आल्या? कोणी ठेवल्या? गुन्हा नेमका कोणावर दाखल केला जाणार याबाबत प्रयत्न करुनही कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
निषेध सभा संपल्यानंतर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वी बुद्रुक बाजारतळावर आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्याच्या समोर झालेल्या घटनेची कैफियत मांडल्याने जिल्हा पोलिस अधिक्षकांशी बोलून सखोल चौकशी करण्याचे सांगतो. म्हणत हा सर्वसामान्याविरोधात होणारा दहशत चांगला नाही त्यांचे झाकण निश्चितचं उघडते. असा टोला त्यांनी लगावला आहे.
बंद व निषेध सभेआधीचा घटनाक्रम..
ग्रामपंचायत निवडणूक काळात मतदारांना अमीष दाखवण्याच्या उद्देशाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळालेल्या कामगार सुरक्षा किट चा साठा विजय हिंगे यांनी अनाधिकृत पणे गायीचा गोठ्यात लपवून ठेवल्याची चर्चा निवडणूक काळात सुरु झाल्यामुळे या किट चिंचपूर येथील नातेवाईक यांच्या घरी ठेवल्या यांची चौकशी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी सरपंच हरिभाऊ ताजणे यांनी कामगार आयुक्त यांच्या कडे १६ नोव्हेंबर रोजी केली होती.
यानंतर साहय्यक कामगार आयुक्त अहमदनगर यांनी सरकारी कामगार आधिकारी तुषार गोपाळ बोरसे व ललित प्रकाश दाभाडे यांना कारवाई आणि तहसीलदार संगमनेर यांना सरकारी पंच उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. चिचंपूरचे तलाठी मच्छिंद्र राहाणे व आश्वीचे तलाठी धोंडीबा भालचिम यांनी आश्वी बुद्रुक येथे शुक्रवारी रात्री कारवाई केली असता हिंगे यांच्या घरामागील शेतात १० कामगार किट (पेटी) संच बेवारस स्थितीत आढळून आले.
या घटनेची माहीती ग्रामस्थांन मिळाली असता मोठ्या संख्येने ग्रामस्थ हिंगे यांच्या वस्तीवर जमा झाले. या प्रकरणात राजकारणातुन विजय हिंगे यांना गोवण्यात आल्याचे म्हणत या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी गावबंद ठेवत, मोर्चा व निषेध सभेचे आवाहन सोशल मिडीया व्दारे करण्यात आले होते. याला ग्रामस्थांनी स्वसंस्फूर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद देत गाव बंद ठेऊन गावातुन निषेध मोर्चा काढत निषेध सभा घेतली.