श्रीराम मंदिर उध्दघाटनानिमित्त अयोध्या येथे भव्य श्री राम कथेचे आयोजन
◻️ भाविकांसाठी अयोध्या, चित्रकूट तीर्थयात्रा व धार्मिक सहलीचे आयोजन
◻️ धार्मिक महोत्सवाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे ह.भ.प. दत्तगिरी महाराजांचे आवाहन
◻️ दाढ खुर्द येथील ह.भ.प. मुकुंद जोरी महाराज यांचा उपक्रम
संगमनेर LIVE | साधू संतांची पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्रातील धर्मप्रेमी भाविक भक्तांच्या सहकार्याने व सकल वारकरी सांप्रदायाच्या वतीने श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र आयोध्या येथे श्रीराम मंदिर उध्दघाटनानिमित्त भव्य श्री राम कथेचे तसेच अयोध्या, चित्रकुट तिर्थयात्रा व धर्मीक सहलीचे दि. ८ मे ते १६ मे २०२४ असे एकून ९ दिवस आयोजन करण्यात आल्याची माहिती ह.भ.प. मुकुंद जोरी यांनी दिली आहे.
या तिर्थयात्रा व धार्मिक सहली दरम्यान भाविकाना अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेले भव्य मंदिर दर्शन, कनक भवन, हनुमान गढी, शरयू नदी स्नान यांचा लाभ घेता येणार आहे. चित्रकूट येथील भेटीत राम - भरत भेट स्थान, सती अनुसया आश्रम (भगवान दत्तात्रय जन्मस्थान), गुप्त गोदावरी, हनुमान धारा, राम घाट, मंदाकिनी नदी स्नान, कामदगिरी प्रदक्षिणा यांचा लाभ घेता येणार आहे. तसेच तिर्थराज प्रयाग येथील भेटीदरम्यान गंगा, यमुना, सरस्वती त्रिवेणी संगम स्नान ही भाविकांना करता येणार असून यावेळी ऐतिहासिक महत्त्व असलेल्या धार्मिक स्थळांना देखील भेटी दिल्या जाणार असल्याची माहिती ह.भ.प. मुकुंद जोरी यांनी दिली आहे.
बाल ब्रह्मचारी ह.भ.प. महंत दत्तगिरीजी महाराज मार्गदर्शनाखाली व रामकथाकार भागवताचार्य ह.भ.प. विठ्ठलपंत महाराज राममाळ यांच्या उपस्थितीत दररोज पहाटे काकडा भजन, पवित्र नद्यांचे स्नान, देवदर्शन, संध्याकाळी हरिपाठ व रात्री सुश्राव्य रामकथा काल्याचे किर्तन व त्यानंतर भव्य महाप्रसाद वाटप केला जाणार आहे.
यावेळी श्री राम जन्मभुमी आयोध्या येथे ७५० साधु संत व ब्राह्मणांना भोजन वितरण, ७५० दिव्यांचा दिपउत्सव, ७५० गरीब, वृध्द व अनाथांना आवश्यक वस्तू वाटप, ७५० गाईंना चारा दान तसेच ७५० विद्यार्थींना शालेय साहित्य वाटप केले जाणार असल्याने यासाठी अन्नदान पंगत किंवा रोख व वस्तु स्वरुपात दान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ह.भ.प मारूती बाबा कुरेकर (आळंदी देवाची), स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज (कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभुमी मंदिर ट्रस्ट आयोध्या), ह.भ.प महंत भास्करगिरीजी महाराज (देवगड संस्थान), ह.भ.प महंत रामगिरीजी महाराज (सरालाबेट संस्थान), स्वामी शांतीगिरीजी महाराज (बाबाजी परीवार) यांनी आशीर्वाद व सदिच्छा दिल्या आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे राम मंदिर उद्घाटनानंतर महाराष्ट्रातून सर्व प्रथम एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याला ओम भारती महाराज (देवडा बाबा), लीला पुरुषोत्तम गोशाळा (कल्याण), ह. भ. प. पंढरीनाथ महाराज (ऋषिकेश), ह.भ.प. गणपत महाराज भांड (दाढ खुर्द), ह.भ.प. लिंबाजी महाराज बीडकर (पाटोदा), ह.भ.प. बाळकृष्ण महाराज कांबळे (ताहाराबाद), ह.भ.प. दत्तात्रय महाराज बहिरट (श्रीरामपुर), ह.भ.प. रविंद्र महाराज मुठे (श्रीरामपुर), ह.भ.प.शांताराम महाराज जोरी (दाढ खुर्द), ह.भ.प. दिनकर महाराज म्हस्के (अ.नगर), ह.भ.प शिवाजी महाराज रेपाळे (पारनेर), ह.भ.प.गजानन महाराज रुपनर (डिग्रस), ह.भ.प. संपत महाराज डोळझाके (हिवरगाव), ह.भ.प. गोविंद महाराज टेकुडे (टेकडवाडी), ह.भ.प. चांगदेव महाराज नेहे (राहुरी), ह.भ.प.गणेश महाराज (माणिकगड वहिरा), ह.भ.प.मोहन बाबा गायकवाड, (आश्वी खुर्द), ह.भ.प.सचिन महाराज (आश्वीकर) सहभागी होणार आहेत.
या धार्मिक महोत्सवात सहभागी होऊन सर्व भाविक भक्तांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प. दत्तगिरी महाराज यांनी केले आहे.
नाम मात्र खर्चात रेल्वे प्रवास, अंतर्गत फिरण्यासाठी ट्राव्हल्स बस तसेच दोन वेळा शुध्द शाकाहारी महाराष्ट्रीयन पध्दतीचे सात्विक भोजन, दोन वेळा चहा, निवासासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
दरम्यान अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील ह.भ.प. मुकुंद महाराज जोरी यांच्या मोबाईल - 7083284316 / 7028284316, दिलीप मांढरे - 9890615605, प्रभाकर दातीर - 9921413342 क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.