आश्वी येथील शासकीय वाळू डेपो चे महसूल मंत्री ना. विखे पाटील यांनी केले ऑनलाईन उध्दघाटन
◻️ नव्या वाळू धोरणानुसार अधिक पारदर्शकता आणणार - ना. विखे पाटील
◻️ नागरीकाना १ लाख ८० हजार ब्रास वाळू उपलब्ध होणार
संगमनेर LIVE | राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी ऑनलाईन पध्दतीने ८ शासकीय वाळू डेपोची उध्दघाटने केली असून यामध्ये आश्वी (ता. संगमनेर) येथील शासकीय वाळू डेपोचो देखिल समावेश होता. या ८ वाळू डेपोच्या माध्यमातून लोकांना १ लाख ८० हजार ब्रास वाळू उपलब्ध होणार आहे.
यावेळी ऑनलाईन द्वारे उपस्थिताना मार्गदर्शन करताना ना. विखे पाटील म्हणाले की, वाळू बाबत नवे सुधारीत धोरण आणून यामध्ये अधिक पारदर्शकता आणणार असल्याची माहिती देऊन शासकीय कामे व घरकुल यांना मोफत वाळू दिली जाणार असल्याचे सांगितले. तसेच महसूलचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचे देखिल विखे पाटील यांनी कौतुक केले आहे.
यावेळी प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, प्रवरा बॅकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, कारखान्याचे संचालक दिनकर गायकवाड, रामभाऊ भुसाळ, भाऊसाहेब जऱ्हाड, अजय ब्राम्हणे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संदीप घुगे, माजी संचालक जेहूरभाई शेख, तबाजी मुन्तोडे, महिला मोर्चाच्या अध्यक्ष कांचनताई मांढरे, माजी जिल्हापरिषद सदंस्य रोहिणीताई निघते, आश्वी खुर्दच्या लोकनियुक्त सरपंच अलका गायकवाड, वाळू डेपोचे चालक निखिल घुगे, सचित घुगे आदिसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित मान्यवरांच्या हस्तें घरकुल लाभार्थी यांना मोफत वाळू वितरण पावती देण्यात आली आहे.