श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शाबुदान खिचडी प्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ!
◻️ संगमनेर येथे ना. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त महाराज मंदिर, बस स्थानक परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
संगमनेर LIVE | अयोध्या येथे मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तीमय वातावरणात प्रभू श्रीरामच्या जयघोषात सुरू असताना संगमनेर येथे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त महाराज मंदिर, बस स्थानक परिसरात आज भारतीय मजदूर संघ संघाचे नेते कारसेवक असलेले अशोकजी भोंग, दत्त मंदिर विश्वस्त भगवानजी गीते, बजरंग दलाचे कुलदीप ठाकूर, सचिन कानकाटे, शिवसेना अध्यक्ष रमेश काळे यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात शाबूदाणा खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले त्यांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला असे आयोजक अमोल खताळ पाटील यांनी सांगितले.
तब्बल ५०० वर्षांनंतर प्रभू श्रीराम विधीवत राम मंदिरात विराजमान झाल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. यावेळेस मोठ्या प्रमाणात जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या गेल्या. तसेच आतिषबाजी केली गेली.
याप्रसंगी रोहिदास गुंजाळ, रोहिदास साबळे, राहुल भोईर, अनिल निळे, भाऊसाहेब रहाणे, रणजित गायकवाड, सतोष दिवटे, रमेश रहाणे, सागर भांगरे, देविदास वराडे, विजय श्रीखंडे, गणेश आंबरे, अजित गायकवाड, पारवे सर, सुयोग जोंधळे, संतोष घुले, केतन भांगरे, मनिष रूपवते सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.