श्री साईबाबा संस्थानला २० लाख रूपये किंमतीची रूग्णवाहीका भेट
◻️ साईभक्त श्रीमती शशिकला कोकरे यांच्याकडून आईच्या स्मरणार्थ भेट
संगमनेर LIVE (शिर्डी) | मुंबई येथील साईभक्त श्रीमती शशिकला शामराव कोकरे यांनी त्यांच्या मातोश्री कै. चंद्रभागा कृष्णा तांदळे यांचे स्मरणार्थ श्री साईबाबा संस्थानला अंदाजे २० लाख रूपये किंमतीची टेंम्पो ट्रॅव्हलर रूग्णवाहीका देणगी स्वरूपात दिली.
यावेळी गाडीची विधीवत पुजा करून श्रीमती शशिकला शामराव कोकरे, मुंबई यांचे प्रतिनिधी रविंद्र सुरवसे, जीवन विश्वकर्मा व विजय तावडे यांनी गाडीची चावी संस्थानचे प्रशासकिय अधिकारी भिकन दाभाडे व प्रशासकिय अधिकारी राजतीलक बागवे यांचेकडे सुपुर्द केली. यावेळी संस्थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते.
श्रीमती शशिकला शामराव कोकरे यांचे प्रतिनिधी रविंद्र सुरवसे, जीवन विश्वकर्मा व विजय तावडे यांनी गाडीची चावी संस्थानचे प्रशासकिय अधिकारी भिकन दाभाडे व प्रशासकिय अधिकारी राजतीलक बागवे यांचेकडे सुपुर्द केलेनंतर त्यांचा सत्कार संस्थानचे प्रशासकिय अधिकारी भिकन दाभाडे यांनी केला.
दरम्यान यावेळी संस्थानचे उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई, लेखाधिकारी कैलास खराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते.