मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आश्वी सह पंचक्रोशीत जल्लोष!
◻️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह महायुती सरकारचे मानले मराठा बांधवांनी आभार
संगमनेर LIVE (आश्वी) | मराठा आंदोलनाला शनिवारी मोठे यश प्राप्त झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटे त्याबाबत अध्यादेश काढण्यात आले आहेत. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. यांची माहिती मिळताचं आश्वी (ता. संगमनेर) सह पंचक्रोशीतील मराठा बांधवांनी जल्लोष करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह महायुती सरकारचे आभार मानले आहेत.
यावेळी आश्वी खुर्द येथे मराठा बांधवांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकाला पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी उप सरपंच बाबासाहेब भवर, संजय गायकवाड, दीपक सोनवणे, विकास गायकवाड, आशिष गायकवाड, नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड, किरण गायकवाड, अमोल गायकवाड, बंटी मांढरे, प्रतिक गायकवाड, रवी भोसले, शकिल शेख, शैलेश सोनवणे, सनी उगले, रावसाहेब मुन्तोडे, आकाश मुन्तोडे, तुषार गायकवाड, ऋतिक गायकवाड आदि उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी इतर समाजातील तरुण देखील मराठा समाजाच्या जल्लोषात सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
दरम्यान उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक, निमगावजाळी, शिबलापूर, पानोडी, झरेकाठी, वरंवडी आदि गावांमध्ये देखील जल्लोष करण्यात आला आहे. यावेळी ठिक - ठिकाणी मराठा योध्दा मनोज जरागें यांच्या नावाचा जयघोष करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेसह महायुती सरकारचे आभार मानण्यात आले आहेत.