शिबलापूरचे सोमनाथ गिते यांचा “राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कारा”ने गौरव

संगमनेर Live
0
शिबलापूरचे सोमनाथ गिते यांचा “राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कारा”ने गौरव

संगमनेर LIVE (आश्‍वी) | पुणे येथील राज्यस्तरीय सामाजिक काम करणारी संस्था म्हणून ओळखली जाणाऱ्या स्वप्नल फाऊंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे ‘राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२४’ नुकताच पार पडला.

या सोहळ्याला डॉ. राजाराम धोंडकर, डॉ. रजनी इंदुलकर, रवींद्र कुलकर्णी, सुनील हुरेरकर, दत्ता कोहिनकर, रेखा खोपकर, रुपाली जाधव, पौर्णिमा राऊत, तेजस्विनी पायगुडे, आनंद पिपळकर, डॉ. राजेंद्र भवाळकर, डॉ. सोमनाथ गिते आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजाराम धोंडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत माननीय सौ. शोभाताई बल्लाळ यांनी केले. वंदना साळोखे यांच्या चौघडा वदनाने सर्व मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. तसेच कुमारी अंजली आखाडे (नृत्यांगना) हिने सर्वांची मने जिंकली. 

शिवांगी आखाडे हिने बैरागी रगतिल शिव स्तुती सादर केली. वंदनाताईंनी चौघडा सनईचे अप्रतिम सादरीकरण केले. डॉ. अमित मोहिते ऊर्फ आम्रपाली यांनी तृतीयापंथी विषयी लोकांची मने कशी आहेत, ते बदलण्यासाठी काय करावे हे सांगितले. अपर्णा काळे यांनी अतिशय सुरेख संगीत गायले. सवाई मसालातर्फे प्रत्येक पुरस्कार विजेत्याला सवाई मसाला संच भेट देण्यात आला.

दरम्यान या कार्यक्रमात कृषीरत्न, सेवारत्न, आरोग्यरत्न, युवारत्न, नारीरत्न, उद्गाररत्न, लोकगौरव, बालगौरव, उत्कृष्ट खेळाडू, आदर्श सरपंच, लोकसेवा, आदर्श माता, आरोग्य सेवा, पत्रकार आदी ७१ जणांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये शिबलापूर येथील व्यसनमुक्तीवर कार्य करणारे डॉ. सोमनाथ गिते यांना “राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार“ प्रदान करण्यात आला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !