◻️ दानवीर भामाशाहा रमणलाल लुंकड आणि अशोक बोरा यांच्याकडून भरीव निधी
संगमनेर LIVE (आश्वी) | राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ॠषीजी महाराज जैंन धर्म स्थानकाचे लोकार्पण आणि नारी सेवा सन्मान सोहळा नुकताच मंगलमय वातावरणात आश्वी (ता. संगमनेर) येथे पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन आणि भव्य व अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त जैन स्थानक पाहून जिल्हाभरातून आलेले जैन समाज बांधव भारावल्याचे चित्र याप्रसंगी पहावयास मिळाले.
जैन साधु व साध्वी हे लोक कल्याणाच्या हेतुने जगाला भगवान महावीरांची अहिंसा व ‘जगा आणी जगु द्या’ ची शिकवण पायी सर्वत्र फिरुन देत असतात. या साधु व साध्वीचे आहारा बाबत कडक नियम असतात. त्यामुळे हा साध्वीचे सेवा कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान व्हावा या हेतुने जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुमतीलाल गांधी यांच्या संकल्पनेतून ‘नारी सेवा सन्मान सोहळ्या’ चे आयोजन राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ॠषीजी महाराज जैंन धर्म स्थानक लोकार्पण सोहळ्यानिमित्त आश्वी येथे करण्यात आले होते.
याप्रसंगी राष्ट्रसंत प. पु. कमलेश मुनीजी महाराज, पु. श्री सुनंदाजी महाराज, सेवाभावी पु. श्री किर्तीसुधाजी महाराज, प. पु. श्री गुरुस्मृर्तीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व दानवीर भामाशाहा रमणलाल कपुरचंद लुंकड पुना यांच्या शुभहस्ते शाळीग्राम होडगर, नवीन मुनोत, प्रकाश भंडारी, अशोक बोरा, झुंबरलालजी बोरा, नंदकुमार भटवेरा, प्रफुल्ल बोगावत, सुमतीलाल भंडारी, मंगलाबाई भंडारी, जयश्री चंगेडीया, लताबाई गुंदेचा, चंचलबाई गांधी, उषाबाई संकलेचा, सतिष लोढा, बाबुशेठ बोरा, मनसुख गुगळे, सुवालालजी लुंकड, कमलेश भंडारी, सुभाष सावज, डाॅ. अशोक लोढा, रमेश गुंदेचा, अनिल पिपाडा, संजय कटारीया, अनिल लोढा, शिरीष दर्डा, दिलीप पारख, वसंत फिरोदिया, राजकुमार गांधी, विनोद गांधी, प्रमोद गांधी, राजेंद्र गांधी, राजेंद्र पिपाडा, मनोज गुंदेचा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी दानवीर भामाशाहा रमणलाल लुंकड, अशोक बोरा यांनी भरीव निधी जाहीर केला.
यावेळी आयोजित नारी सेवा सन्मान सोहळ्यासाठी अहमदनगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातून आलेल्या हजारो जैन बांधवांनी कौतुक केले. दरम्यान यावेळी गौतम प्रसादीचे आयोजन निर्मला रसिकलाल रातडीया यांच्या कडुन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमतीलाल गांधी यांनी केले. सूत्रसंचलन रुपा गोडगे तर आभार सुशील भंडारी यांनी मानले.