लेकीच्या विवाह सोहळ्यात सामाजिक दातृत्व जपणारा बापमाणूस!

संगमनेर Live
0
लेकीच्या विवाह सोहळ्यात सामाजिक दातृत्व जपणारा बापमाणूस!

◻️ मुलीच्या लग्नानिमित्त सामाजिक काम करणाऱ्या संस्थेला दिली देणगी

संगमनेर LIVE | कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील संतोष चव्हाण यांच्या लेकीचा विवाह सोहळा दहेगाव येथील द्वारकामाई लॉन्स येथे नुकताच संपन्न झाला. 

या विवाह सोहळ्यादरम्यान संतोष चव्हाण यांनी सत्कार, स्वागत, शाल, पुष्पगुच्छ अशा गोष्टींना फाटा देत वारी येथील सामाजिक दातृत्व व मानवता हाच धर्म यानुसार कार्य करणाऱ्या राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टला ११ हजार रुपयांची रोख स्वरूपात मदत दिली. त्यामुळे लेकीच्या विवाह सोहळ्यात सामाजिक दातृत्व जपणाऱ्या या बापमाणसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विवाह सोहळा म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील आनंदाचा क्षण. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात विविध गोष्टींवर खर्च करत आपण आनंद उत्सव साजरा करत असतो. परंतु, अशाच वेळी समाजात असे काही लोक, घटक असतात की त्यांनाही आपण केलेली छोटीशी मदत ही त्यांच्या जीवनासाठी खूप अनमोल असते. मात्र, बऱ्याचदा मोठमोठ्या विवाह सोहळ्यांमध्ये या गोष्टी दुर्लक्षित असतात. परंतु सामाजिक बांधिलकी जपणारे संतोष चव्हाण यांनी आपल्या लेकीचा अर्थात ऋतुजा हिचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात केला. 

यावेळी त्यांनी सामाजिक काम करणाऱ्या ट्रस्टलाही मदत केली. या मदतीतून गरजवंतांची सेवा होणार आहे. ज्यांना मदत होईल ते या नवदांपत्याला अंतकरणापासून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. संतोष चव्हाण यांनी आजवर सामाजिक जीवन जगताना निस्वार्थ भावनेतून असंख्य विवाह जमवले आहेत. विशेष म्हणजे ते सर्वच गुण्यागोविंदाने नांदतही आहेत. हीच सर्व पुण्याई ऋतुजाच्या आयुष्यात महत्वपूर्ण ठरणारी आहे. संतोष चव्हाण यांच्या योगदानाबद्दल रोहित टेके यांनी भावना व्यक्त केल्या. तसेच ऋतुजा आणि रोहन या नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच आपल्या जीवनातील आनंदाच्या क्षणी म्हणजेच विवाह सोहळा, स्वतःचा वाढदिवस, कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस या सह ज्या गोष्टीने आपल्याला आनंद होतो. प्रत्येक क्षणी व आपल्या प्रियजनांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील ट्रस्टला आर्थिक मदत करून निश्चितच गरजवंत निराधाराच्या चेहऱ्यावरील आनंद फुलवण्याचे आवाहन रोहित टेके यांनी केले आहे.

दरम्यान यावेळी धोत्रे गावचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण, माजी सरपंच मनोज चव्हाण, वैजापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक शैलेश चव्हाण, हभप विनायकजी महाराज टेके आदि उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !