उंबरी बाळापूर येथील प्रवरेच्या विद्यार्थीनीचे शिष्यवृत्ती परिक्षेत सुयश
संगमनेर LIVE (आश्वी) | नुकत्याच पार पडलेल्या सन २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उंबरी बाळापूर येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा माध्यमिक विद्यालयातील तीन विद्यार्थीनीनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
यावेळी विद्यालयातील कु. मयुरी मुरलीधर माळी, कु. कल्याणी नंदकिशोर महानुभाव, समीक्षा भागवत भुसाळ या तीन विद्यार्थीनीनी शिष्यवृत्ती परिक्षेत सहभाग नोंदवत घवघवीत यश संपादन केले. मुख्याध्यापक प्रदीप आलवणे, वर्गशिक्षिका चैताली निरपळ, स्वाती बोंद्रे, अश्विनी बिडवे, शंकर जोंधळे, सुनिता तांबे, संगीता मुन्तोडे व देवराम भांगरे यांचे या विद्यार्थीनींना बहुमोल मार्गदर्शन लाभले.
दरम्यान या विद्यार्थीनींचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामभाऊ भुसाळ, पोलिस पाटील सौ. वैशाली मैड, ग्रामपंचायत सह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले आहे. तसेच या विद्यार्थीनींचा मुख्याध्यापक प्रदीप आलवणे व सेवा सहकारी सोसायटीचे बापुसाहेब भुसाळ यांनी रोख बक्षिस देऊन सत्कार देखील केला आहे.