◻️ शिक्षक व मित्र - मैत्रिणीच्या भेटीमुळे प्रवरेचे विद्यार्थी गहिवरले!
◻️ फळ रोपाचे वाटप करत दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश
संगमनेर LIVE (आश्वी) | उंबरी बाळापूर (ता. संगमनेर) येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयातील सन २००२ - ०३ च्या बॅचचे इयत्ता दहावीतील विद्यार्थी व शिक्षकवृंदांच्या उपस्थितीत स्नेहमेळावा नुकताचं साजरा करण्यात आला.
तब्बल २१ वर्षानंतर सर्व ७० वर्गमित्र एकत्रित आल्याने वातावरण भारावून गेले होते. तत्कालीन दहावीच्या वर्ग मित्र व मैत्रिणी आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असून या स्नेहमेळाव्यानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आल्यामुळे हे माजी विद्यार्थी गहिवरल्याचे चित्र पहावयास मिळाले.
यावेळी प्रवरेचे जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक भीमराज काशीद, मनोज सकळकर, सुरेश बिडवे, तसेच माणिकराव गायकवाड, बाळासाहेब हळनोर, रामनाथ घोलप, पी. दिघे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका विजया भुसाळ, वैशाली पाबळ यांच्यासह या स्नेह मेळाव्याचे आयोजक व माजी विद्यार्थी प्रकाश उंबरकर, अमृतराज चोपडे, योगेश चौधरी, संजय बर्डे, तात्यासाहेब निर्मळ, रवींद्र भुसाळ, दादाभाई शेख, विलास शेळके, योगेश उंबरकर, ज्योती उंबरकर, सवीता भुसाळ, कवीता भुसाळ, गणेश भुसाळ, अतुल भुसाळ, रवींद्र भुसाळ, गणेश पावबाके, चाॅद पठाण, राजश्री भुसाळ, अतुल सारबंदे, भाऊसाहेब भुसाळ, भावना उंबरकर, भीमराज शिंदे, विशाल भुसाळ, सचिन भुसाळ, मदन भुसाळ, योगीता डोखे, सवीता डोखे, गणेश शिखरे, संगीता भुसाळ, हरिश्चंद्र सांरबदे, हौशाबापू खेमनर, लहानू भुसाळ, मनीषा वर्पे, मनीषा सरबंदे, प्रिया भुसाळ, सुवर्णा सांबरे, भावना उंबरकर, रुपाली कदम, सतीष उंबरकर, शरद सारबंदे, शीतल सारबंदे, सुनील बर्डे, संदीप बर्डे, सुनीता मैड, श्रीकांत शेळके, सुशील शेळके, सुनील सारबंदे, लक्ष्मण सारबंदे, दीपक उंबरकर, वंदना शेळके, मनीषा भुसाळ, चंद्रकांत महानुभाव, भाऊसाहेब भुसाळ, ज्योती थोरात आदि उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित शिक्षकानी कार्यक्रमाची रुपरेषा पाहून भारावले असल्याचे मनोगत मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केले.
कार्यक्रामाचे आयोजक असलेले माजी विद्यार्थी प्रकाश उंबरकर म्हणाले की, ज्याप्रमाणे आई आणि मुलांची नाळ आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यत जोडलेली असते. तसेच काहीसे नाते शिक्षक व विद्यार्थ्याचे असते. “आमचा दहावीचा वर्ग हा केवळ वर्ग नसून तो आमचा जीव की प्राण“ असल्याच्या भावना व्यक्त करताना त्यांचा कंठ दाटून आला होता. मित्रांच्या जोड्या वर्गातील बेंचवर बनत असल्याचे सांगून वर्ग शाळेचा असो की, इतर ठिकाणी आपल्याला नेहमी आधार देणारा हा मित्रचं असतो. त्यामुळे नाटकी जगात केवळ मित्र हेचं सत्य असल्याचे प्रकाश उंबरकर म्हणाले आहेत. तसेच आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोअर नसल्याने हव्या हव्याशा गोष्टी तुम्हाला डाऊनलोड करता येत नाही आणि नकोशा गोष्टी या डिलिट करता येत नसल्याचे सांगताना भरपूर जीवन जीवन जगाताना इतरांशी प्रेमाने वागण्याचे आवाहन उंबरकर यांनी केले.
तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त करताना २१ वर्षात आलेल्या चांगल्या वाईट आठवणीना उजाळा देताना “शाळेतील ते दिवस कोट्यवधी रुपये देऊन ही परत मिळणार नसल्या“बाबत म्हणत असताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्याचे पहावयास मिळाले. तर यशाच्या उंच शिखरावर भरारी घेत असताना आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यवसाय, शेती, देशसेवा, उत्कृष्ट गृहिणी या देश विदेशात आपल्या कामाच्या बळावर गावचे नाव मोठे करत असल्याबद्दल माजी विद्यार्थ्याचे कौतुक करण्यात आले.
अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटल्याने भेटीच्या आनंदासोबत आठवणींच्या दुनियेत रममान होताना या विद्यार्थ्याना डोळ्यांतून डोकावणारे अश्रू थोपविता आले नाहीत. याप्रसंगी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्याना या स्नेह मेळाव्याच्या आठवणी चिरकाल स्मरणात राहाव्यात यासाठी फळ झाडाचे रोपटे भेट म्हणून देताना वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला.
दरम्यान या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थ्यानसह ग्रामपंचायत व प्रवरा शाळेने विशेष परिश्रम घेतले.