खळी येथे तब्बल १२ फुटांचा अजगर सापडला
◻️ लोकांची भिंतीने गाळण ; सर्पमित्राने हळुवार पणे अजगराला घेतले ताब्यात
संगमनेर LIVE (आश्वी) | मागील अनेक वर्षापासून प्रवरा नदी पट्यातील गावांमध्ये विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्रमाण वाढले आहे. अशातचं खळी (ता. संगमनेर) येथील भाऊसाहेब नागरे यांच्या शेतात एक पाहूना म्हणजे भलामोठा अजगर निपचित पडलेला आढळून आला. त्यामुळे या अजगराला पाहून लोकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. तात्काळ आश्वी येथील सर्पमित्र शिवा पवार याला बोलवण्यात आले. त्याने हळुवार पणे या अजगराला ताब्यात घेतले.
खळी येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब नागरे यांच्या शेतात बुधवारी दुपारच्या सुमारास पुरुष, महिला हे काम करत होते. सागर भाऊसाहेब नागरे या तरुणाला संशयास्पद हालचाल होताना दिसली. त्यामुळे त्यांने जवळ जाऊन पाहिले असता भला मोठा म्हणजे तब्बल १२ फूटाचा अजगर निपचित पडलेला आढळला. हा सर्प मेला असल्याचा भास झाल्यामुळे त्याने जवळ जाऊन पाहिले तर अजगर भितीपोटी मोठ्याने फुत्कारला. त्यामुळे या तरुणाची चांगलीचं धांदल उडाली.
आवाज ऐकून शेतात काम करत असलेले लोकं त्या ठिकाणी आले आणि प्रसंगावधान दाखवत आश्वी येथील सर्पमित्र शिवा पवार याला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच शिवा पवार यांने घटनास्थळी जाऊन हळुवार पुणे या अजगराला ताब्यात घेतले. तोपर्यत उपस्थित लोकांची भितीने गाळण झाली. मात्र अजगराला ताब्यात घेतल्यामुळे लोकांनी सूटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान यावेळी भाऊसाहेब नागरे, सागर नागरे, पोपट वाघमारे, बाळू गवळी, भास्कर नागरे आदिंसह शेतात काम करणाऱ्या महिला उपस्थित होते.