बिबट्या आणि तरसानंतर हरणांचा देखील आश्वी परिसरात वावर वाढला
◻️ विडीओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात वायरल
◻️ भविष्यात आश्वी परिसरात जैवविविधतेच्या दर्शनाची शक्यता
संगमनेर LIVE (आश्वी) | बुधवारी प्रथमचं आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथे हरीण कॅमेरात कैद झाले आहे. हरीण हा प्राणी दुर्मिळ नसला तरी आश्वी परिसरात पहिल्यांदाच मुक्त पणे विहार करताना पाहवयास मिळाला आहे.
आश्वीसह प्रवरा नदी पट्यातील गावांमध्ये मागील अनेक वर्षापासून बिबट्या, तरस आणि रानडुक्कर यांच्यासह सरपटणाऱ्या विषारी प्राण्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे मोर, कोल्हे, ससे, कुत्रे हे प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
अशात बुधवारी सकाळी आश्वी खुर्द आणि शेडगाव शिवेलगत असलेल्या शेतात एक हरीण बसलेले दिसले. त्यामुळे तेथून जाणाऱ्या लोकांनी उत्सुकतेपोटी या हरणाला कॅमेरात कैद केले आहे. त्यामुळे तो विडीओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे.
दरम्यान भविष्यात बिबटे आणि तरसाप्रमाणे हरणांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे भविष्यात आश्वी परिसरात जैवविविधता पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.