एकविरा फाऊंडेशन आयोजित योग शिबिरास संगमनेरकरांचा उदंड प्रतिसाद
◻️ योग शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद - डॉ. सुधीर तांबे
◻️ स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा - डॉ. जयश्री थोरात
संगमनेर LIVE | योगा ही भारताने जगाला दिलेली देणगी असून योगामुळे मन आणि शरीराचा एकत्रित व्यायाम होतो. संगमनेर मधील नागरिकांच्या निरोगी जीवनासाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या योगा शिबिर हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवउद्गार जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.
मालपाणी लॉन्स येथे एकविरा फाउंडेशन व इन्फिनिटी योगा स्टुडिओ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योगा शिबिरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी डॉ. जयश्री थोरात, सिंगापूर आलेल्या प्रशिक्षक मनीषा वामन, इंफिनिटीचे रितेश सोनवणे, श्रीराम कुऱ्हे यांचे सह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. तांबे म्हणाले की, धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला योगाची गरज आहे. योगामुळे मन आणि शरीर एकत्र येऊन व्यायाम होतो एकाग्रता वाढते आणि कार्यक्षमता व उत्साह निर्माण होतो.
योग ही भारताने जगाला दिलेली देण आहे. आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जात आहे. या निमित्ताने डॉ. जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून एकविरा फाउंडेशनने मागील चार दिवसापासून संगमनेर मध्ये भव्य योग शिबिर आयोजित केले. असून यामध्ये महिलांचा विशेष सहभाग राहिला आहे. योगा हा फक्त एका दिवसापुरता नसून यापुढेही प्रत्येकाने केला पाहिजे. निरोगी जीवन हीच सर्वात मोठी संपत्ती असून ते जपण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन केले त्यांनी केले.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम आयोजित केले जात असून महिलांचे आरोग्य व योगाचे महत्त्व याकरता मागील चार दिवसापासून संगमनेर मध्ये योग शिबिरासह झुम्बा डान्स होत आहे. याला महिलांचा व नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा असा सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान योग दिनानिमित्त संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणी योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून विविध महाविद्यालय व विद्यालयांमधील योग शिबिरातही अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.