माजी मंत्री थोरात यांच्या कार्यकर्त्याचे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आभार
◻️ आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य - घोडके
संगमनेर LIVE | महाविकास आघाडीचे नेते आमदार बाळासाहेब थोरात याच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना मोठे मताधिक्य मिळवून दिल्याबद्दल ठाकरे गटाच्या वतीने यशोधन कार्यालयात इंद्रजीत थोरात यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार बाळासाहेब थोरात यांचे यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे शिवसेना शहर उपप्रमुख बाळासाहेब घोडके, सचिव समीर ओझा, उप तालुकाप्रमुख दीपक मुळे, विभाग प्रमुख असिफ तांबोळी, मच्छिंद्र सांगळे यांनी इंद्रजीत थोरात यांचा सत्कार केला. यावेळी मुख्याधिकारी श्रीराम कुऱ्हे आदीं उपस्थित होते.
राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले असून काँग्रेस पक्षाचे १३ खासदार विजयी झाले आहेत. याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातून सहा खासदार विजय होताना अहमदनगर दक्षिण व उत्तरे मधून आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम करून खासदार भाऊसाहेब वाकचौरे व खासदार निलेश लंके यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले
राज्यघटना वाचवण्यासाठी सुरू असल्या लढाईमध्ये सर्व कार्यकर्ते एकत्र होऊन लढल्याने भाऊसाहेब वाकचौरे यांचा मोठा विजय झाला आहे त्यामुळे संगमनेर मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रति व कार्यकर्त्यांचे कृतज्ञता व्यक्त करताना यशोधन कार्याचे प्रमुख इंद्रजीत थोरात यांचा सत्कार केला
याप्रसंगी बाळासाहेब घोडके म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळाले आहे. संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल असून आमदार थोरात यांनी कायम एक तालुका एक परिवार मानला आहे. त्यामुळे सर्वजण अत्यंत गुन्या गोविंदाने नांदत असून हा तालुका इतरांसाठी आदर्शवत असल्याचेही म्हटले आहे.