प्रथमेश नवीन मुनोत ‘सीए’ परीक्षा उत्तीर्ण!
◻️ नगर येथील दर्शना उद्योग समूह तर आश्वी येथील आदेश्वर उद्योग समूहाशी आहे त्याचे अतुट नाते
संगमनेर LIVE | नुकत्याच जाहीर झालेल्या सीए परीक्षेत प्रथमेश नवीन मुनोत याने घवघवीत यश संपादन केले. प्रथमेश हा नागापूर, अहमदनगर येथील दर्शना उद्योग समूहाचे संचालक पुनमचंद मुनोत यांचा मुलगा तर संचालक जितेंद्र मुनोत यांचा पुतण्या आहे तसेच माळीचिंचोरा येथिल कचरदास मुनोत यांचा तो नातू आहे. आश्वी येथील आदेश्वर उद्योग समूहाचे संचालक तथा पत्रकार योगेश रातडीया तसेच निलेश रातडीया यांचा प्रथमेश हा भाचा असल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
प्रथमेशचे माध्यमिक शिक्षण ऑक्सिलीयम कॉन्व्हेंट स्कूल येथून व उच्च माध्यमिक पेमराज सारडा कॉलेज तर पदव्युत्तर शिक्षण गरवारे कॉलेज पुणे येथे झाले. त्याला सीए राजेंद्र बोरा, सीए रोहित बोरा, सीए प्रीती बोरा, सीए जयदीप कटारिया, सीए संदीप देसरडा, सीए प्रसाद भंडारी तसेच प्राध्यापिका वृषाली गांधी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
दरम्यान प्रथमेश उत्तीर्ण झाल्याची माहिती मिळताच कुटुंबासह मित्रपरिवाराने जल्लोष साजरा केला असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.