निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी
◻️ २०० वारकऱ्यांना औषध किटचे वितरण, सल्ला आणि मार्गदर्शनामुळे वारकरी समाधानी
संगमनेर LIVE (आश्वी) | श्री क्षेत्र अगस्ती ऋषीं देवस्थान अकोले येथील वारकऱ्याची दिंडी निमगावजाळी (ता. संगमनेर) येथे मुक्कामी आले होते. पंढरपूर आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र निमगावजाळी यांच्या मार्फत २०० वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉक्टरांनी आपुलकीने वारकऱ्यांची चौकशी करत रक्तदाब, मधुमेह, ताप, पाठदुखी, सर्दी, खोकला यासह विविध रक्त तपासण्या केल्या. तसेच वारकरी यांना दुखापत झालेल्या जागी मलम पट्टी देखील केली. तसेच दिंडी प्रमुखांना डॉ. तय्यब तांबोळी आणि डॉ. देविदास चोखर यांच्याहस्ते मार्फत आरोग्य किट व औषध साठा देण्यात आला.
याप्रसंगी आरोग्य केंद्राचे सीएचओ सचिन गवारे, अविनाश तांबे, आरोग्य सेवक दिपक महाजन, नरेंद्र पोटे, शिमोन नवगिरे, महेश पतंगे, आरोग्य सेविका अंजुम पठाण, महालॅबचे तुषार तांबे, आशा गटप्रवर्तक कल्पना डेंगळे व आशा कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान यावेळी वैद्यकीय सेवेबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.