सत्तेचा अहंकार उतरवण्याची जबाबदारी जनतेची - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
सत्तेचा अहंकार उतरवण्याची जबाबदारी जनतेची - बाळासाहेब थोरात

◻️आश्‍वी येथे अमृतवाहिनी बँकेच्या नूतन शाखेचा शुभारंभ

संगमनेर LIVE | आपण कधीही चुकीचे राजकारण केले नाही. सर्वांना बरोबर घेऊन प्रेमाने आणि विकासाचे राजकारण केले म्हणून जनता सातत्याने आपल्या सोबत आहे. दहशतीचे आणि जीरवाजीरवीचे राजकारण फार काळ चालणार नाही आणि जनता ही सहन करणार नाही. त्यामुळे सत्तेचा अहंकार उतरवण्याची जबाबदारी आता जनतेची असल्याची टिका जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

संगमनेर तालुक्यातील आश्‍वी बुद्रुक येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या नूतन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बाळासाहेब थोरात बोलत होते.

थोरात पुढे म्हणाले की, दहशत व दडपशाही असतानाही आश्‍वी व परिसराने २५ वर्ष सातत्याने मोठे मताधिक्य दिले. आपण विकास कामांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. विरोधकांची ही कामे केली.

मागील अडीच वर्षाच्या काळात या परिसरातील अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या. यासाठी पाठपुरावा केला. सर्वांना बरोबर घेऊन प्रेमाचे व विकासाचे राजकारण केले ही आपली परंपरा आहे.

मात्र या उलट या परिसरामध्ये मोठी दहशत आहे. विरोधी गावचा सरपंच असेल तर अगदी पिण्याच्या पाण्यापर्यंत राजकारणाचे विष या लोकांनी नेऊन ठेवले आहे. जिरवा जिरवीचे आणि दमदाट्याचे राजकारण फार काळ चालत नाही. दहा वर्ष गणेश तुमच्या ताब्यात असताना चांगला चालवता आला नाही. 

आमची भावना आणि उद्देश चांगला म्हणून गणेश कारखाना अत्यंत चांगला चालला. मात्र, त्यामध्येही अनेक अडचणी निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. गोरगरिबांच्या प्रपंचाशी खेळू नका सत्तेचा गर्व जनतेने उतरवला आहे. संगमनेर प्रमाणे राहाता आणि शिर्डीमध्येही चांगले वातावरण निर्माण करू असेही आमदार थोरात म्हणाले.

दरम्यान यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जयश्री थोरात आदिनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे यांनी आभार मानले. 

लोकसभेत जनतेने दमछाक केली आता तुम्ही कुटुंबाला वेळ द्या..

लोकसभेमध्ये पराभूत झालेल्या उमेदवार आता राहता, संगमनेर मध्ये उभ्या राहण्याच्या बतावणी करत आहेत. अरे बाबा नगर दक्षिण मध्ये जनतेने चांगली दमछाक केली. लोकांनी आराम करण्यासाठी वेळ दिला. आता कुटुंबाला वेळ द्या. वाटलं तर व्यवसाय करा असा मिश्किल टोला सौ. प्रभावती घोगरे यांनी डॉ. सुजय विखे याचे न घेता लगावला.

खोट्या केसेस दाखल करण्याचा धडाका - डॉ. पिपाडा

राजकारण हे जनतेच्या विकासाचे झाले पाहिजे. मात्र शिर्डी मतदार संघामध्ये दडपशाही आणि हुकूमशाहीचे राजकारणातून सध्या ॲट्रॉसिटी, विनयभंग खोट्या केसेस दाखल करून धाक निर्माण केला जात आहे. त्यामुळे याविरुद्ध भाजप नेतृत्वाकडे दाद मागणार असल्याचे डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी म्हटले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !