निळवंडे धरणाचे पाणी प्रतापपुर आणि चिंचपुर शिवारात दाखल
◻️ ग्रामस्थांकडून पाण्याचे जलपूजन व विखे पाटील कुटुंबाचे आभार
संगमनेर LIVE (आश्वी) | राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. सुजय विखे पाटील आणि सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या पुढाकारातून निळवंडे धरणातून कालव्याद्वारे ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे संगमनेर व राहाता तालुक्यातील लाभधारक भागातील शेतीला व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पाण्यातून प्रतापपुर आणि चिंचपुर गावातील ओढे, पाझर तलाव तसेच केटीवेअर पुर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे आनंदी झालेल्या शेतकऱ्यांनी या पाण्याचे जलपूजन करत विखे पाटील कुटुंबाचे आभार मानले आहेत.
निळवंडे धरण आणि कालव्याचे श्रेय हे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे असून ओव्हरफ्लोचे पाणी लाभक्षेत्रात आल्यामुळे शेतकऱ्याचा आनंद द्विगुणित झाला असल्याची भावना विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे तसेच आमदार राधाकृष्ण विखे पाटील ट्रक वाहतूक सोसायटीचे संचालक व जेष्ठ नेते भगवानराव इलग यांनी जलपूजन प्रसंगी बोलुन दाखवताचं उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याला अनुमोदन दिले.
दरम्यान जलपूजन प्रसंगी कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, जेष्ठ नेते भगवानराव इलग, प्रवरा बॅकेचे संचालक गीताराम तांबे, लक्ष्मण तांबे, श्रीरंग तांबे, गजाबा तांबे, नामदेव तांबे, विठ्ठल तांबे, गीताराम पवार, शंकर तांबे, हौशीराम तांबे, सुनील तांबे, किसन तांबे, पांडुरंग आंधळे, गजानन आव्हाड, रंगनाथ आंधळे, बाळासाहेब सांगळे, सखाराम आंधळे, दत्ता आंधळे, अनिल गीते, चिंचपूर गावचे विश्वनाथ तांबे, किरण तांबे, बाळासाहेब तांबे, अशोकराव तांबे, अंबादास तांबे, शंकर तांबे, वेणुनाथ तांबे, दत्तू तांबे, अण्णासाहेब तांबे आदीसह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.