राहाता तालुक्यातील अवैध दारु विक्री करणाऱ्या हॉटेलवर छापे
◻️ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
◻️ पोलीसांचे १४ ठिकाणी छापे ; ६५ हजाराचा मुद्देमाल जप्त
संगमनेर LIVE | आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यामध्ये विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.
त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस अंमलदार बबन मखरे, अतुल लोटके, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, विशाल तनपुरे, प्रमोद जाधव तसेच बापुसाहेब फोलाणे, रणजीत जाधव व रोहित मिसाळ यांचे दोन पथक तयार करून जामखेड व राहाता तालुक्यामधील विनापरवाना दारु विक्री करणारे विरुद्ध कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
या पथकाने दि. २१ रोजी जामखेड, राहाता व लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विनापरवाना दारू विक्री करणारे हॉटेलवर छापे टाकुण कारवाई केली. कारवाईमध्ये एकुण १४ गुन्हे दाखल करुन १४ आरोपींचे ताब्यातुन ६५,०४० रुपये किंमतीची देशी विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांमार्फत यापुढे देखील अवैध धंद्याविरुध्द कारवाई चालु राहणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
अ. नं. पोलीस ठाणे, जप्त मुद्देमाल किंमत, दाखल गुन्हे, आरोपी संख्या..
१ जामखेड ८ ४७,०८० ८
२ राहाता ४ १२,००० ४
३ लोणी २ ५,९६० २
एकुण १४ गुन्हे दाखल ६५,०४० व १४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.