शिर्डीत स्वतंत्र एमआयडीसी पालकमंत्री विखे पाटील यांच्या पुढाकारातून
◻️ भाजपचे प्रदेश महामंत्री विनोद दळवी यांचे गौरवोद्गार
◻️ ओबीसी मोर्चाची शिर्डी, संगमनेर श्रीरामपुर विधानसभा पदाधिकारी बैठक संपन्न
संगमनेर LIVE | पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटिल यांनी अनेक वर्ष प्रलंबित असलेली शिर्डीत स्वतंत्र एमआयडीसी सुरू करण्यासाठी पुढाकर घेतला. यामुळे मतदार संघातील अनेक युवक आणि युवतींच्या हाताला काम मिळणार आहे. याच बरोबर शिर्डी संस्थान मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराना कायम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुढाकार असल्याचे गौरवोद्गार भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश महामंत्री विनोद दळवी यांनी काढले.
भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने शिर्डी, संगमनेर श्रीरामपुर विधानसभा पदाधिकारी बैठक नुकताच संपन्न झाली. यावेळी महामंत्री विनोद दळवी, प्रदेश संपर्क प्रमुख मनोज ब्राम्हणकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, डॉ. विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, गुलाबराव सांगळे, सरचिटणीस सौरभ कोळपकर, विधानसभा प्रमुख वैभव ताजणे, प्राध्यापक कान्हु गिते, बाळासाहेब सानप, भारत गवळी, महेश विश्वकर्मा, राजेद्र सांगळे, निलेश रणाते आदी उपस्थित होते.
महामंत्री विनोद दळवी पुढे म्हणाले की, भाषण करण्याची वेळ आता संपली आहे. ओबीसी मोर्चाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आप आपल्या बुध मध्ये जास्तीत जास्त घोगंडी बैठकीवर भर दिला पाहिजेल. बुध बैठकी मधुनच समोरील व्यक्तीची मन की बात तुम्हाला समजेल याचा फायदा मतदान वाढण्यासाठी होणार आहे.
यावेळी राज्य शासनाने राज्यातील सोनार समाजासाठी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केली. याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथील सुवर्णकार बांधवानी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश महामंत्री विनोद दळवी, प्रदेश संपर्क प्रमुख मनोज ब्राम्हणकर तसेच जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर यांचा सत्कार केला.
महायुती सरकारने ओबीसी बांधवासाठी विविध योजना आणल्या आहे. प्रत्येक पदाधीकाऱ्यांनी घोगडी बैठकी मध्ये शासनाच्या विविध योजनेची माहीती देणे आवश्यक आहे. तसेच लार्भाथीसाठी मिळेलेला लाभाची माहिती करून देण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी करणे आवश्यक असल्याचे आवाहन मनोज ब्राम्हणकर यांनी केले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील २० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदान प्रकिये मध्ये १ लाखाहुन अधिक मताधिक्याने निवडुन येतील यामध्ये ओबीसी समाजाचे ३० ते ३५ हजार मतदान असेल. यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या बुध मधील जास्तीत जास्त मतदांराना साहेबांनी केलेल्या विकास कामाची माहीती देणे आवश्यक असल्याचे मत बाळासाहेब गाडेकर यांनी व्यक्त केले.