खंडकरी शेतकरी व कंत्राटी कामगारांचा प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद - डॉ. सुजय विखे

संगमनेर Live
0
खंडकरी शेतकरी व कंत्राटी कामगारांचा प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद - डॉ. सुजय विखे

◻️ माजी महसूल मंत्र्यानी जनतेसाठी केलेले एक तरी काम दाखवावे

संगमनेर LIVE (शिर्डी) | मतदारसंघातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीनीचा आणि संस्थानातील कंत्राटी कामगारांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अखेर मार्गी लागल्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना  डॉ. सुजय विखे पाटील यांनी बोलून दाखवली.

सावळीविहिर बुद्रुक येथे विविध विकास कामांचा शुभारंभ, मुख्यमंत्री वयोश्री योजना नोंदणी सोहळा, तसेच महीला बचत गटांना फूड प्रोसेसिंग युनिट वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या सोहळ्याला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी, पदाधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते. 

यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघातील विकासाच्या संदर्भात बोलताना सांगितले की, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, येथे मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून खंडकरी शेतकऱ्यांचे जमिनींचे वर्गीकरण आणि इतर तांत्रिक बाबी सोडवून, २५० कोटी रुपयांची बचत शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे.

एमआयडीसीचा विकास आणि रोजगाराच्या संधी..

सावळीविहीर येथे एमआयडीसी प्रकल्पात प्रत्येक घरातील किमान एक व्यक्तीला रोजगार मिळणार असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. शेती महामंडळाच्या ५०० एकर जागेत एमआयडीसी निर्माण होत असून त्याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. पुढील पाच वर्षांत मत मागायला येईल तेव्हा सावळी विहीर येथील प्रत्येक घरातील व्यक्तीला या प्रकल्पातून रोजगार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांवर टीका..

विरोधकांवर जोरदार टीका करताना विखे पाटील म्हणाले, “जे माजी महसूल मंत्री सात वर्षे पदावर होते, त्यांना गरिबांची आठवण का झाली नाही? त्यांनी या जनतेसाठी एक तरी काम केले आहे का? आता निवडणुका जवळ आल्या की हे नेते समाजात फिरताना दिसतात. परंतु, विखे पाटील परिवार नेहमीच लोकांच्या संपर्कात असतो आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतो.”

सोमय्या औद्योगिक वसाहतीतील प्रश्न..

डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, सोमय्या औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. या संदर्भात आराखडे तयार आहेत आणि लवकरच या वसाहतीतील समस्या सोडवल्या जातील. तसेच, या वसाहतीत महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील. 

एमआयडीसी व पशुवैद्यकीय दवाखान्यातील आवश्यक वस्तूंसाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या कापडी पिशव्या आणि इतरया कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या आश्वासनांवर समाधान व्यक्त केले. विकास कामे मार्गी लागल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. साहित्य पुरवले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शिर्डी मतदारसंघातील सर्वच प्रश्न नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवले जात असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसाठी उभारलेले विविध प्रकल्प आणि योजना यामुळे या भागात प्रगतीची गंगा वाहत असल्याचे त्यांनी नमूद केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !