परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहभागी व्हा - अमोल खताळ

संगमनेर Live
0
परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहभागी व्हा - अमोल खताळ

◻️ हिवरगाव पावसा, अंभोरे, डिग्रस, मालुंजे, पिंपरणे आदि गावात खताळाचा दौरा

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात ज्यांची दहशत, दादागिरी आहे ती मोडून काढण्याचे काम आता मतदारांनी ठरविले आहे. यावेळची विधानसभेची निवडणूक सर्वसामान्य कष्टकरी, दिन - दलित, गोरगरीब, ज्येष्ठ नागरिक, तरुण, लाडक्या बहिणी या सर्वांनी हातात घेतली आहे. त्यामुळे नक्कीच परिवर्तन होणार आहे. या परिवर्तनाचा पण सर्वांनी खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा उचलावा असे आव्हान महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी मतदारांना केले.

संगमनेर खुर्द गटातील हिवरगाव पावसा, निमगाव टेंभी, शिरापूर, रायते, वाघापूर खराडी, देवगाव, जाखोरी, कोळवाडे, अंभोरे, डिग्रस, मालुंजे आणि पिंपरणे या गावांना महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी भेट देत मतदारांशी संवाद साधला. 

यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहणे, भाजप डॉक्टर सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष अभय बंगाळ, माजी तालुकाप्रमुख काशिनाथ पावशे, भाजप युवा मोर्चाचे गणेश दवंगे, केशव दवंगे, संदीप वर्पे, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुयोग गुंजाळ, भाजप उपाध्यक्ष संदेश देशमुख, मराठा समन्वयक डॉ. सतीश खर्डे, देवगावचे सरपंच सुनील लामखडे, जाखुरीचे सरपंच नितीन पानसरे, कोळीवाडे बूथ प्रमुख सुरेश काळे यांच्यासह महायुतीचे पदाधि कारी कार्यकर्ते उपस्थित होते.

अमोल खताळ म्हणाले की, संगमनेर तालुका हा आमचा परिवार आणि कुटुंब आहे, असे येथील लोकप्रतिनिधी सांगत आहे. परंतु, इतरवेळा कुटुंब आणि परिवार यांना का आठवत नाही. वाळू तस्कर भू - माफिया आणि चार बगल बच्चे हेच का त्यांचे कुटुंब आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर काही तरुण पुढे चालले तर त्यांचे विचार दाबण्याचे प्रयत्न सुरू आहे. 

संगमनेर तालुक्यात तरुणांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. त्यामुळे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केले जाणार आहे. तालुक्यामध्ये विकास करताना कायमच भेदभाव केला जात आहे तो भेदभाव आपल्याला बाजूला सारायचा आहे. त्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावागावातील तरुणांनी घराघरात जाऊन महायुतीचा विचार पोहोचवायचा आहे. 

प्रत्येक गावातील तरुणांनी लाडक्या बहिणींनी मतं मिळवण्यात खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा उचलावा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महिलांचा सन्मान केला जात आहे. मात्र या तालुक्यात महिलांचा अपमान केला जात आहे हे दुर्दैव आहे. आपल्याला विकासाबरोबर राज कारण करायचे आहे. तर, भ्रष्टाचाराला गाडायचे आहे. त्यासाठी सर्वानी या परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केलं या निवडणुकीत अमोल खताळ हा महायुतीचा उमेदवार नव्हे तर तुम्ही सर्वजण उमेदवार आहेत असं मानून सर्वांनी या परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !