ते तुमच्यात भांडणे लावतील पण, मतदान होईपर्यंत संयम बाळगा - अमोल खताळ

संगमनेर Live
0
ते तुमच्यात भांडणे लावतील पण, मतदान होईपर्यंत संयम बाळगा - अमोल खताळ

◻️ महायुतीचे उमेदवार खताळ यांच्याकडून तळेगाव गटातील गावामधील मतदारांच्या भेटी

◻️ तालुका आमचे कुटुंब म्हणणाऱ्यानी मात्र, निंबाळे येथील घटनेचा निषेध केला नाही?

संगमनेर LIVE | संगमनेर विधानसभेची निवडणूक ही धन शक्ती विरुद्ध जनशक्ती झाली आहे. ही निवडणूक आता सर्व सामान्य जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या पाया खालची वाळू सरकू लागली आहे. ते आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील तसेच तुमच्या गावांत येऊन तुमच्यामध्ये भांडणे लावण्याचे काम करतील परंतु मतदान होईपर्यंत संयम बाळगावा. असा सल्ला शिवसेना महायुतीचे उमेदवार अमोल  खताळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या प्रचारार्थ तळेगाव गटातील वडगावपान, कोकणगाव, कोंची - मांची, लोहारे, कसारे, मेंढवन, कोठे कमलेश्वर, वडझरी, तळेगाव, तीगाव, करुले, निळवंडे आदी गावातील मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी आयोजित कॉर्नर सभेत खताळ बोलत होते. 

यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र सोनवणे, वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात, भाजप उपाध्यक्ष हिरामण वायकर, निळवंडेचे उपसरपंच भाऊसाहेब आहेर, मेंढवनचे उपसरपंच डॉ. सोमनाथ बढे, माधव थोरात, विनायक थोरात, बाबा आहेर, मिनानाथ जोंधळे, लोहरेचे सुदर्शन पोकळे, कसारचे सरपंच नवनाथ कानकाटे, कौठे कमळेश्वरचे माजी सरपंच नवनाथ जोंधळे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

उमेदवार अमोल खताळ म्हणाले की, संगमनेर विधान सभेतील महायुतीची मतदारसंघातील लाडक्या बहिणीसह तरुण आणि जेष्ठ नागरिकांनी तालुक्यात परिवर्तन करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या परिवर्तनाच्या लढाईत आपण सर्वजण सहभागी होऊन खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा उचलावा. सर्व मतदारांच्या घरी जाऊन महायुतीला मतदान करण्याचे काम आपण सर्वांनी करावे‌. आपण ही निवडणूक जिंकल्यात जमा झाली आहे. गुलालही आपलाच होणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असे खताळ यांनी सांगितले.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी आपल्या भाच्यासाठी यंत्रणा पाठवून दिली. लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिणेत दादागिरी दहशत करणारा आणि सोयीनुसार आपली भूमिका बदलणाऱ्य निलेश लंकेसाठी यंत्रणा लावली ही यांची टोळी आहे. या टोळीचा मोरक्या संगमनेरचा लोकप्रतिनिधी आहे. हे निलेश लंके शिरूर आणि सुपा एमआयडीसी हप्ते घेऊन इकडे येऊन भाषण करतात. त्यांनी आम्हाला शिकवू नये. सर्वसामान्य जनतेवर दादागिरी आणि दहशत करून अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मी खबऱ्याचे काम करणार आहे. तुमच्यासारखे आम्ही महिलांना गाडीतून बाहेर काढून मारहाण करत नाही. अशा शब्दात समाचार घेतला.

संगमनेर तालुका आमचा परिवार आणि कुटुंब आहे असे ते म्हणत आहे. तर मंग निंबाळे येथे झालेल्या घटने मधील मुलगी तुमच्या कुटुंबातील नव्हती का? तुम्ही साधा निषेध सुद्धा करू शकले नाही. ज्यांनी मारहाण केली ते तुमचे कोण होते? असा परखड सवालही महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता उपस्थित केला.

माझी निवडणूक लाडक्या बहिणी, तरुण, जेष्ठ नागरिक, कष्टकरी, गोरगरिबांनी हातात घेतली आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणत असाल आम्ही तालुक्याचा विकास केला तर, केलेला विकास सांगण्यासाठी तुम्हाला तीन खासदार आणि एका माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाला का पाचारण करावे लागते? त्यामुळे आत्ताच आपण ही निवडणूक जिंकलो असल्याचे खताळ यांनी म्हटले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !