शिर्डीत जे. पी. नड्डा यांच्या सभेसाठी अभूतपूर्व मोटर सायकल रॅली

संगमनेर Live
0
शिर्डीत जे. पी. नड्डा यांच्या सभेसाठी अभूतपूर्व मोटर सायकल रॅली

◻️ पालकमंत्री विखे पाटील यांच्या समर्थकांचे शक्तिप्रदर्शन

संगमनेर LIVE (शिर्डी) | शिर्डी शहरात बुधवारी महायुतीचे उमेदवार ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री ना. जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेला शिर्डी परिसरातील भाजप कार्यकर्त्यासह स्थानिक नागरिकांनी उत्साहात गर्दी केली. नड्डा यांच्या आगमनानिमित्त शिर्डी विमानतळापासून सभास्थळापर्यंत काढलेल्या मोटारसायकल रॅलीने संपूर्ण शहराचा उत्साह निर्माण झाला होता.

सहा ते सात किलोमीटर वाहनांच्या रांगा..

जिल्ह्यात कधीही न झालेली एवढ्या मोठ्या प्रमाणातील मोटारसायकल रॅली या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली. रॅलीच्या मार्गावर सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. कार्यकर्त्यांनी फुलांची पुष्पवृष्टी करत आणि जयघोषाच्या गजरात स्वागत केले. ठिकठिकाणी उभारलेल्या स्वागत कमानींनी रॅलीचा मार्ग सुशोभित केला होता.

ग्रामस्थांकडून उत्साहात डॉ. सुजय विखे पाटील यांचे भव्य स्वागत..

रॅली शिर्डीत पोहोचताच ग्रामस्थांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वागत जोरदार पुष्पवृष्टीत केले. महिला भगिनींनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढत, फुलांच्या वर्षावात औक्षण करत आदरपूर्वक स्वागत केले. महिलांनी असे सांगितले की, “राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शिर्डी परिसराचा विकास वेगाने झाला आहे. त्यांनी शेतकरी, महिला आणि युवकांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या योगदानामुळे आज त्यांना समाजाकडून आदर मिळत आहे.”

नड्डा यांच्याकडून महायुतीच्या विकासकार्यांचा गौरव..

सभेत ना. जे. पी. नड्डा यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विकासकामांचा गौरव केला आणि महायुतीच्या उमेदवारांबद्दल समाजात विश्वास निर्माण झाल्याचे म्हटले. त्यांच्या भाषणातून कार्यकर्त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळाले. “शिर्डी व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे, आणि आगामी काळात आणखी विकासाच्या संधी निर्माण होतील,” असे त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून नमूद केले.

उत्सवाचे वातावरण ; महिला आणि युवकांचा जोश..

सभास्थळी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जोशपूर्ण वातावरण निर्माण केले. महिलांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. त्यांच्या उपस्थितीने आणि सहभागाने महायुतीच्या प्रचारामध्ये अभूतपूर्व ऊर्जा पाहायला मिळाली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !