अमोल खताळ यांच्याकडून संगमनेर शहरातील मतदारांच्या भेटी
◻️ लाडक्या बहिणींनी खताळ यांचे औक्षण करुन राख्या बांधल्या
संगमनेर LIVE | महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी संगमनेर शहरातून प्रचार फेरी काढत मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या. ग्रामीण भागासह शहरी भागातही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे ते नक्कीच विजयी होतील असा दावा त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व गावांचा जिल्हापरिषद गटानुसार खताळाकडून दौरा सुरू असून सर्व ठिकाणी त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उमेदवार अमोल खताळ यांनी आज संगमनेर शहरातील इंदिरानगर, चैतन्यनगर, जनतानगर, गणेशनगर, शिवाजीनगर व मालदाड रोड परिसरातील मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठी भेटी घेत संवाद साधला. यावेळी अनेक लाडक्या बहिणींनी उमेदवार खताळ यांचे औक्षण केले. तर, लाडक्या बहिणींनी त्यांना राख्या बांधत आम्ही तुमच्या मागे भक्कमपणे उभ्या आहोत असा विश्वासही दिला.
यावेळी भाजपचे पक्ष निरीक्षक जगदीश मखवाना, ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश काळे, शहर प्रमुख दिनेश फटांगरे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाप्रमुख सोमनाथ भालेराव, शहर संघटक अमोल रानाते, भाजप सरचिटणीस राहुल भोईर, भाजप नेते संपतराव गलांडे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भारत गवळी, शशांक मेनन, अंबादास अनमल, भाऊ मस्के, श्याम कोळपकर, सविता दिघे, नीलम खताळ, ताई कानकाटे, दिपाली वावळ, कावेरी नवले, वैशाली रानाते यांच्यासह शिवसेना, भाजप महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने या प्रचार फेरीत सहभागी झाले होते.