आश्‍वी परीसर बागायतदार करण्याचे श्रेय विखे कुटुंबाचे- अँड. शाळीग्राम होडगर

संगमनेर Live
0
आश्‍वी परीसर बागायतदार करण्याचे श्रेय विखे कुटुंबाचे- अँड. शाळीग्राम होडगर

◻️ आश्‍वी बुद्रुक येथे महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ

संगमनेर LIVE (आश्‍वी) | महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग आठव्यांदा आमदार म्हणून बहुमताने निवडून आणायचे आहे. असे सांगताना प्रवरा नदीवर केटी वेअरच्या मध्यमातुन पाणी आडवण्यात आले. त्यामुळे बारामाही जिरायत शेती ही पाण्याखाली आली. तसेच लिफ्ट आणि कालव्याच्या माध्यमातून आश्‍वी परीसरातील शेती ही बागायत करण्याचे काम हे विखे कुटुंबाने केले असल्याचे गौरवोद्गार मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर यांनी काढले.

संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदार संघातील आश्‍वी बुद्रुक येथील अमरेश्वर मंदिरामध्ये महायुतीचे उमेदवार भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना अँड. शाळीग्राम होडगर बोलत होते.

अँड. होडगर पुढे म्हणाले की, बहुजन समाजाच्या उपजिविकेचे साधन शेती आहे. आशा शेतकऱ्यांना पहिल्यांदा शेतीला पाणी देऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनासाठी मोठी मदत विखे पाटील यांनी केली. यामुळे परीसरामध्ये लहान सहान उद्योग धंदे तसेच व्यापार पेठ वाढण्यासाठी मोठी मदत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी सरपंच हरीभाऊ ताजणे म्हणाले की, विखे परिवाराच्या माध्यमातून मागील ४० ते ५० वर्षापासुन वाड्या वस्त्यावर जाणाऱ्या रस्त्याला मुरमी करण केले जाते. जर विखे परीवार मुरमी करण करत असेल तर, त्यांवर तुम्ही खडीकरण करून डांबरी रस्ता का करत नाही? असा प्रश्न उपस्थित करत केवळ विरोध करायचा म्हणुन विरोधक त्याच्या प्रचार सभेमध्ये मुरमी करणाचा पाढा वाचत असल्याचे सांगून विखे पाटील यांच्या विरोधात कुठलाही मुद्दा सापडत नसल्यामुळे विरोधाकाचे पोट दुखत असल्याची जळजळीत टिका ताजणे यांनी केली.

प्रवरा बँकेचे संचालक माधवराव गायकवाड म्हणाले की, विखे पाटील यांच्या विकास कामाची यादी कधी ही न संपणारी आहे. एका बाजुला विकासाचा डोगर आहे तर, दुसऱ्या बाजुला भकास असे वास्तव आहे. राजकारणामध्ये विकास कामांना महत्व आहे. त्यामुळे सामान्य जनता ही विकास कामे बघुन मतदान करत असल्याचे सांगून राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रचडं मतानी विजय करण्याचे आवाहन केले.

प्रवरा शिक्षण संस्थेचे संचालक भाऊसाहेब जऱ्हाड म्हणाले, मी ३० वर्ष माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर काम केले. परंतु पालथ्या घड्यावर पाणी घालतल्यावर त्या घड्यामध्ये एक थेंब ही पाणी जात नाही. त्याचंप्रमाणे आश्‍वी परीसरातील विकास कामाना बगल देण्याचे काम हे थोरात यांच्याकडुन झाले असल्याचे ते म्हणाले.

माजी जिल्हा परिषद सदस्या अँड. रोहीणीताई निघुते म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने महिलासाठी विविध योजना आणल्या. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महामंडळाच्या एसटी मध्ये महीलांना ५० टक्के प्रवास मध्ये सवलत, मेडीकल तसेच इंजिनेअरींग सारख्या महागड्या शिक्षणामध्ये मुलींसाठी १०० शिक्षण फी सवलत देत सावित्रीच्या लेकीनां स्वःताच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली असल्याचे त्यानी सांगत नामदार विखे पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते विनायकराव बालोटे, संजय गांधी, विजयराव चतुरे, हिंगे गुरूजी, ग्रामपंचायत सदस्य सारीका जऱ्हाड, अनिस शेख, प्राध्यापक कारभारी म्हसे आदीनी देखील मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रवरा बँकेचे संचालक अजय ब्राम्हणे, सोसायटी चेअरमन आण्णासाहेब जऱ्हाड, माजी संचालक प्रभाकर निघुते, शाळीग्राम चंद, विजयराव म्हसे, अनिल कंगणकर, जानकिराम गायकवाड, अशोक जऱ्हाड, नवनाथ ताजणे, भिमा शिंदे भाऊसाहेब खेमनर, चाॅद शेख, व्यापारी सुशिल भंडारी, नामदेव होडगर, मंच्छिद्र ताजणे, बाबा गायकवाड, अनिल म्हसे आदिसह तरुण आणि जेष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान प्रचार नाराळ कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी आदम धोंडूभाई शेख हे होते. अध्यक्षपदाची सूचना वैभव ताजणे यांनी मांडली तर सुचनेस अनुमोदन प्रवरा शिक्षण संस्थेचे संचालक भाऊसाहेब जऱ्हाड यांनी दिले. तसेच या कार्यक्रमाचे आभार अँड. गौरव सांबरे यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !