बाळासाहेब थोरातानी घेतली पिंपळगाव देपा येथील जळीत कुटुंबाची भेट
◻️ अभंग कुटुंबियांना डॉ. जयश्रीताई थोरात यांच्याकडूनही दिलासा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा येथे अभंग कुटुंबीयांच्या घराला लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले होते. याची माहिती मिळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी तातडीने या कुटुंबीयांना भेट घेतली आहे.
यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून अभंग कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून संसार उपयोगी साहित्य, किराणा व घरगुती वापराची भांडी देऊन मदत करण्यात आली.
यावेळी अभंग कुटुंबीयांची भेट घेऊन बाळासाहेब थोरात यांनी सर्व माहिती जाणून घेतली. यावेळी समवेत डॉ. जयश्रीताई थोरात, प्रा. बाबा खरात, सरपंच अलका मिंडे, ज्ञानदेव रावसाहेब मिंडे, संतोष घाणे, बाबासाहेब गांजवे, लक्ष्मण खेमनर, साहेबराव हजारे, शिवाजी हजारे, पाराजी हजारे, साहेबराव अभंग, जनसेवक रोहिदास नागरे, सतीश शेजवळ आदी उपस्थित होते.
पिंपळगाव देपा येथील कारभारी अभंग यांच्या घराला आग लागली. यात सोन्याचे तीन लाख पंचवीस हजार रुपयांचे दागिने, एक लाख पच्चहत्तर हजार रुपये रोख रक्कम, १५ पोते धान्यांसह सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामुळे हे कुटुंब मोठ्या संकटात सापडले. या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजताच बीड येथे देशमुख कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेलेले लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी व युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी यशोधन कार्यालयास तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
याच बरोबर माजी मंत्री बाळासाहेब थोरात व डॉ. जयश्रीताई थोरात यांनी या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा परिवार मानला आहे. ते सदैव प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात सहभागी आहेत. जीवनामध्ये अनापेक्षित पणे काही घटना घडतात. मात्र त्याला खंबीरपणे सामोर गेले पाहिजे. अभंग कुटुंबीयांनी नवीन घर बांधण्यासाठीचे स्वप्न ठेवले. मात्र काल लागलेल्या आगीतून कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाकडून विविध स्तरावरून मदत मिळवण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करू असे त्या म्हणाल्या.