◻️ ६ जानेवारी रोजी राज्याभिषेक सोहळ्याचे भव्य आयोजन
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | महाराजा यशवंतराव होळकर राज्यभिषेक दिन सोहळा समितीच्या सदस्य पदी पांडुरंग माने यांची निवड करण्यात आली आहे.
याबाबत राज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष युवराज श्रीमंत महाराज भुषणसिह राजे होळकर याच्या आदेशानुसार पांडुरंग माने यांची समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातून माने यांचे अभिनंदन होत आहे.
दरम्यान ६ जानेवारी रोजी राज्याभिषेक सोहळा पुणे जिल्ह्यातील वाफगाव राजगुरुनगर (खेड) येथे पार पडणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी सर्वाना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पांडुरंग माने यांनी केले आहे.