भाजपाच्या उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी नितीन दिनकर
◻️ विठ्ठलराव लंघे हे शिवसेनेत जाऊन आमदार झाल्यामुळे पद झाले होते रिक्त
संगमनेर LIVE (शिर्डी) | भारतीय जनता पक्षाच्या उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नितिन दिनकर यांची निवड करण्यात आली.
भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे हे शिवसेनेत गेल्यामुळे त्यांच्या जागी रिक्त झालेल्या पदावर नेवासा तालुक्यातील नितीन दिनकर यांची निवड प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नितिन दिनकर हे नेवासा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या माध्यमातून एक कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे या पदावर त्यांची निवड करण्यात आली आहे.
दिनकर यांनी यापूर्वी नेवासा तालुका अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, श्रीरामपूर विधानसभा प्रमुख, प्रदेश प्रवक्ता, शिर्डी लोकसभा विस्तारक, शिर्डी लोकसभा संयोजक असे अनेक पदावर काम करून पदाला न्याय दिला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सत्कार केला आहे. तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषद सभापती राम शिंद, माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार वैभवराव पिचड, स्नेहलता कोल्हे, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे, नितीन कापसे, रवी बोरावके, युवा मोर्चा प्रदेश सचिव श्रीराज डेरे, सोशल मीडिया सेल जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर आदिसह भाजपच्या महिला तसेच विविध सेलच्या पदाधिकारी यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.