डॉ. विखे पाटील फाउंडेशन महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

संगमनेर Live
0
डॉ. विखे पाटील फाउंडेशन महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

◻️ विळद घाट येथे २८ डिसेंबर रोजी तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

◻️ परिषदेकरिता ५२० शिक्षक, परिचारीका व विद्यार्थ्याची नोदणी

संगमनेर LIVE (नगर) | डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयात “सक्षम सार्वभौम नेतृत्व तयार करून परिचर्या क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल करणे” या विषयावर २८ डिसेंबर २०२४ रोजी तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषद विळद घाट येथे सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.

आरोग्य क्षेत्रामध्ये होणाऱ्या जलदगती बदलामुळे परिचारिका क्षेत्रामध्ये सार्वभौम, सशक्त व मजबुत नेतृत्याची आवश्यकता भासत आहे. परिचारिका क्षेत्रामध्ये काम करणाच्या नेतृत्वांना दैनंदिन कामकाजात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. आरोग्य क्षेत्रात होणाच्या बदलांचा परिणाम हा परिचारिका क्षेत्रातील नेतृत्वामध्ये बदल घडवून आणण्यास कारणीभूत आहे. आरोग्यसेवा प्रणालींचा दबाव तसेच आरोग्यसंदर्भातील जागतिक समस्याना सामोरे जाण्यासाठी परिचारिका क्षेत्रामध्ये सार्वभौम सक्षम असे नेतृत्व तयार होणे गरजेचे आहे जेणेकरून परिचारिका क्षेत्राचे भविष्य उज्वल होऊ शकेल. डॉ विखे पाटील परिचर्या महाविद्यालयाचे २० वर्षांपासून कुशल व गुणसंपन्न विद्यार्थी घडविण्याचे काम सुरू आहे, त्या निमीत्ताने महाविद्यालयात “सक्षम सार्वभौम नेतृत्व तयार करून परिचर्या क्षेत्राने भविष्य उज्ज्वल करणे" या विषयावर तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर परिषदेकरिता डॉ. पायपर, साहाय्यक प्राध्यापक ग्राउंड कॉलेज, संयुक्त राज्य अमेरिका (यू.एस.ए) या प्रमुख अतिथी असुन 'परिचारिका क्षेत्रामध्ये परिपुर्ण क्षमतेचे नेतृत्व तयार करून परिचारीका सेवेचा दर्जा उंचावणे' या विषयावर आपले मत मांडणार आहेत

डॉ. सर्वेश सुवरेश खन्ना, प्राध्यापक व संस्थापक, इमिरियट्स पेट्रोन, न्यूयॉर्क (अमेरिका) या 'भविष्यातील नेतृत्व व परिचारिका क्षेत्रातील नेतृत्वाचे सक्षमीकरण करणे' ह्या विषयावर व्याख्यान देणार आहेत, डॉ. नानसी डायस, सहाय्यक प्राध्यापक पश्चिम कॅरोलिना विद्यापीठ या अनुकरणीय सार्वभौम नेतृत्व तयार करून परिचर्या क्षेत्रात नेतृत्व उचावणे तसेच मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटलच्या संचालक डॉ. फलाक्षी मांजरेकर या सशक्त नेतृत्व तयार करून परिचारीका क्षेत्राची उंची वाढविणे हे विषय माडणार आहेत.

तसेच परिचारीका क्षेत्रात नेतृत्वाचे भविष्य, आव्हान व संधी या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. या चर्चासत्राकरिता डॉ. शोभा गायकवाड, सहाय्यक प्राध्यापक एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई या नियंत्रक असतील. तसेच या चर्चासत्रामध्ये सौ. ग्रेसी मथाई, सी. ओ. बेबी  मेमोरियल हॉस्पिटल केरळ, डॉ. नीलीमा सोनवणे, अतिरिक्त नर्सिंग संचालक, आरोग्य आयुक्तालय मुंबई, डॉ. अजिता नायर व्यवस्थापकीय संचालक आरोग्यसेवा व्यवस्थापन आणि डॉ. पर्ल क्रूज, लिड हिमॅटोलॉजी रिसर्चक्वीन एलिजाबेथ हॉस्पिटल आय. एन. एच. इंग्लड हे सर्व तज्ञ सहभागी होणार आहेत.

या परिषदेकरिता सुमारे ५२० शिक्षक, परिचारीका व विद्यार्थ्यांनी नोदणी केलेली असून शिक्षक व विद्यार्थी आपले शोध निबंध सादर करणार आहेत.

दरम्यान परिषद यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त सौ. शालिनीताई विखे पाटील तसेच विश्वस्त व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !