सरकारकडून राज्यातील मंत्र्याचे खाते वाटप जाहीर

संगमनेर Live
0
सरकारकडून राज्यातील मंत्र्याचे खाते वाटप जाहीर

◻️ मुख्यमंत्र्याकडे गृह, पवारांकडे अर्थ तर शिंदेंकडे नगर विकास खाते

◻️ ना. विखे पाटील यांच्या वाट्याला जलसंधारण / जलसंपदा खात्याचे मंत्रीपद

संगमनेर LIVE | मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप कधी होणार, अशी चर्चा सुरू होती. अशात सरकारच्या वतीने आज रात्री खातेवाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते हे त्यांच्याकडेच कायम राहिले आहे. अर्थ खाते हे अजित पवारांकडे देण्यात आले आहे. गृहखात्यासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते देण्यात आले आहे.

कॅबिनेट मंत्री पुढीलप्रमाणे..

१) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते

२) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग

३) उपमुख्यमंत्री अजित पवार - अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क

४) चंद्रशेखर बावनकुळे - महसूल

५) राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

६) हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण

७) चंद्रकात पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

८) गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

९) गणेश नाईक - पर्यटन

१०) गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा

११) दादा भुसे - शालेय शिक्षण

१२) संजय राठोड - माती व पाणी परीक्षण

१३) धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

१४) मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

१५) उदय सामंत - उद्योग आणि मराठी भाषा

१६) जयकुमार रावल‌ - मार्केटिंग आणि प्रोटोकॉल

१७) पंकजा मुंडे - पर्यावरण आणि हवामान बदल, अँनिमल हसबंडरी

१८) अतुल सावे - ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी

१९) अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय

२०) शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

२१) आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान

२२) दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

२३) अदिती तटकरे - महिला व बालविकास

२४) शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम

२५) माणिकराव कोकाटे - कृषी

२६) जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज

२७) नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन

२८) संजय सावकारे - कापड

२९) संजय शिरसाट - सामाजिक न्याय

३०) प्रताप सरनाईक - वाहतूक

३१) भरत गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन 

३२) मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन

३३) नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे

३४) आकाश फुंडकर - कामगार

३५) बाबासाहेब पाटील - सहकार

३६) प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री पुढीलप्रमाणे..

३७) माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

३८) आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

३९) मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

४०) इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन

४१) योगेश कदम - गृहराज्य शहर

४२) पंकज भोयर - गृहनिर्माण

याप्रमाणे यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !