जनतेने टाकलेल्या विश्वासाला मी विकास कामातुन पात्र ठरेल - आ. अमोल खताळ
◻️ मुंबई स्थित संगमनेर - अकोले तालुक्यातील स्नेहवर्धक संघटनेकडून आमदार अमोल खताळ यांचा सत्कार
संगमनेर LIVE (मुंबई/आश्वी) | शेतकऱ्यांच्या मुलाला संगमनेरच्या जनतेने आमदार म्हणुन पाठवले. त्यामुळे तालुक्यातील मतदाराचा मी आभारी आहे. तालुक्यात अनेक विकास कामे प्रलंभित असुन ती लवकरचं मार्गी लावली जाणार आहेत. जनतेने टाकलेल्या विश्वासास मी विकास कामातुन पात्र ठरेल. अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
५६ वर्षाची सामाजीक परंपरा जपणाऱ्यां संगमनेर - अकोले तालुक्यातील स्नेहवर्धक संघटना, मुंबईच्या वतीने नुकतेच आमदार अमोल खताळ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार खताळ बोलत होते.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अंबादास आंबरे, चिटणीस अशोक आवारी, खजिनदार प्रवीण शेणकर आदीसह संगमनेर तसेच अकोले तालुक्यातील मुंबई, ठाणे, डोंबिवली, पणवेल तसेच मुंबई उपनगरात स्थित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात संगमनेर विधानसभेत मतदांनासाठी आलेले अनेक मतदार देखील उपस्थित होते. यावेळी त्याचे आभार आमदार अमोल खताळ यांनी मानले. येणाऱ्या काळात संगमनेर तालुक्यातील विकास कामाना आपण प्राधान्य देणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले आहे.
दरम्यान यावेळी आमदार अमोल खताळ यांच्यासमवेत सेल्फी घेण्यासाठी उपस्थित लाडक्या बहिणींची झुंबड उडालेली पाहून आमदार खताळ देखील त्यांच्या आनंदात सहभागी झाले होते.
मागील ५६ वर्षापासुन संगमनेर व अकोले तालुक्यातील मुंबई स्थित रहीवाशी हे वर्षभर विविध कार्यक्रम करत असतात. यामध्ये समाजामध्ये सामाजिक, शौक्षणिक तसचे विविध स्थरावर कामे करणाऱ्या मान्यवराचे सत्कार, दिनदर्शिका प्रकाशन, वधु वर सुचक मेळावा भरवणे तसेच वार्षिक स्नेहसंमेलन घेत असल्याची माहिती मुंबई स्थित स्नेहवर्धक संघटनेचे अध्यक्ष अंबादास आंबरे यांनी यावेळी दिली.