श्री मोठेबाबा हे आमचे ही आराध्य दैवत - सौ. नीलमताई खताळ
◻️ खांबे येथे ग्रामदैवत श्री मोठेबाबा यात्रोत्सवाला सुरुवात
संगमनेर LIVE (आश्वी) | मोठेबाबा यांचे मूळ ठाण हे अंकाई किल्ल्यावर असून गुरख्यांबरोबर देव खांबे या ठिकाणी आले असे बोलले जाते. श्री मोठेबाबा हे गावाकऱ्याप्रमाणे आमचे ही आराध्य दैवत आहे. त्यामुळे जेव्हा ही वेळ मिळतो तेव्हा खताळ परीवार येथे दर्शनासाठी येत असतो. अशा भावना सौ. नीलमताई खताळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
संगमनेर तालुक्यातील खांबे गावचे ग्रामदैवत श्री मोठेबाबा यात्रोत्सवनिमित्त आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ. खताळ यानी नुकतीच गावाला भेट देत मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने सौ. खताळ यांचा सत्कार करण्यात आला. यात्रेनिमित्त येथील दोस्ती साम्राज्य ग्रुपने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी सौ. खताळ यांनी दोस्ती साम्राज्य ग्रुपचे अभिनंदन करून शुभेच्या देऊन यात्रेतील दुकानदारांची भेट घेऊन विचारपूस केली.
यावेळी सरंपच रविंद्र दातीर यांनी श्री क्षेत्र मोठेबाबा देवस्थानचा ‘क’ वर्गात समावेश करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली. त्यावर येणाऱ्या काळामध्ये श्री मोठेबाबा देवस्थान खांबे यांची आमदार अमोल खताळ हे नक्कीच प्रयत्न करतील असे आश्वासन सौ. खताळ यांनी दिले.
दरम्यान याप्रसंगी उपसरपंच भारत मुठे, सदस्य मीनाताई भांगे, मनीषा दातीर, रोहिणी कापडी, शितल कापडी, अनिता दातीर, अजय दातीर, डॉ. भास्कर दातीर, अमोल पोंदे, वैभव शिंदे, रतन दातीर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.