डॉ. बाळासाहेब विखे यांचे विचार अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक - प्रा. शिवाजी अनर्थे
◻️ आश्वी खुर्द येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन
संगमनेर LIVE (आश्वी) | स्व. खासदार पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी राजकारणाला समाज बदलाचे माध्यम म्हणून काम केले. त्यांनी ग्रामविकास, सहकार, सिंचन, शिक्षण आदी क्षेत्रात मूलभूत काम केले आहे. त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय ,आर्थिक, शैक्षणिक विषयावरील दुरगामी विचार पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून कायम राहतील असे प्रतिपादन प्रा. शिवाजी अनर्थे यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक अण्णासाहेब भोसले होते. बापूसाहेब गायकवाड, निवृत्ती सांगळे, भाऊसाहेब जऱ्हाड, ज्ञानदेव वर्पे, डॉ. महेश खर्डे, प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
दरम्यान प्रारंभी प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीतू मांढरे, प्रा. वर्षा गायकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. सीताराम अनाप यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.