सावित्रीबाई फुलेंच्या संर्घषमुळेचं महिलांना समाजामध्ये योग्य सन्मान - लता बिडवे
◻️ आश्वीसह परीसरात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जंयती उत्साहात साजरी
संगमनेर LIVE (आश्वी) | सावित्रीबाई फुले या पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका होत्या. ज्ञानदान करताना त्याना अनेक अडचणी आल्या मात्र अस्पृश्य समाजाच्या शिक्षणाचा प्रवास त्यांनी थांबविला नाही. त्यांनी केलेल्या संर्घषमुळेचं आज महिलांना समाजामध्ये योग्य सन्मान मिळत असल्याचे गौरवोद्गार शिक्षिका लता बिडवे यांनी काढले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील जिल्हा परीषद प्राथमिक मुलींच्या शाळेमध्ये ३ जानेवारी सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जंयती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच इतर गावांमध्ये देखील सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुलीनी सावित्रीबाई फुले यांचा सारखा पोक्षाक परीधान केला होता. तसेच विद्यार्थीची भाषणे झाली. यावेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब गिते, संगिता क्षिरसागर, लता बिडवे, रंजना गिते यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
शिक्षिका बिडवे पुढे म्हणाले की, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती ज्योतीबा फुले हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. या दोघांनी १ जानेवारी, १८४८ रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात.
दरम्यान जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. त्या एक लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असे देखील म्हटले आहे.
अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी १८२९ मध्ये मुंबईत मुलींची शाळा सुरू केली होती. १८४७ मध्ये, विद्यार्थी साहित्यिक आणि वैज्ञानिक समाजाने मुंबईच्या गिरगाव परिसरात मुलींसाठी कमलाबाई हायस्कूल सुरू केले. पेरी चरण सरकार यांनी १८४७ मध्ये बारासात या बंगाली शहरात कालीकृष्ण गर्ल्स हायस्कूल नावाची मुलींसाठी शाळा सुरू केली. पारशी समुदाय मुंबईने १८४७ मध्ये मुलींसाठी एक शाळा देखील स्थापन केली असल्याचे संगिता क्षिरसागर यांनी यावेळी सांगितले आहे.