खडकाळ माळरानाचे शिक्षण संकुलात झालेले परिवर्तन हे प्रेरणादायी - नयना गुंडे
◻️ मांचीहिल येथे दोन दिवसीय सांस्कृतिक कला महोत्सवाला सुरुवात
◻️ जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यानी जिद्द हे भांडवल म्हणून वापरावे - शैलेंद्रसिह होडगर
संगमनेर LIVE | मांचीहिल सारख्या खडकाळ माळरानावर शिक्षण संस्था उभी राहिल्यामुळे या परिसराचे झालेले सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तन हे इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार आदिवासी विकास विभागाच्या नाशिकच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी काढले. तसेच या संस्थेमध्ये राबविले जात असलेले शैक्षणिक उपक्रम इतर ठिकाणी देखील राबविण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असा लौकीक असलेल्या संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलातील ज्ञानगंगा विद्यानिकेतन व महाराजा यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल येथे दोन दिवसीय सांस्कृतिक कला महोत्सवाला नुकतीच उत्साहात सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मार्गदर्शन करताना आयुक्त नयना गुंडे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शैलेंद्रसिह होडगर होते. डाॅ. नितीन जठार, डॉ. दिग्विजयसिहं होडगर हे देखील यावेळी उपस्थित होते.
डॉ. शैलेंद्रसिंग होडगर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यानी शारीरिक स्वास्थ्य यावर लक्ष देताना जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्दीचा वापर हा भांडवल म्हणून करावा असा मौलीक सल्ला दिला.
डॉ. नितीन जठार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “सेवाभावी वृत्ती हाचं यशाचा खरा राजमार्ग असुन विद्यार्थ्यानी कामातून मोठे व्हावे” असे आवाहन केले.
याआधी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष विजय पिसे यांनी करताना शिक्षण संस्थेत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय नितीन गीते यांनी तर, कार्यक्रमाचे आभार शशिकांत गमे यांनी मानले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यानी सादर केलेल्या एनसीसी संचलन आणि विविध कलागुणांचे कौतुक केले.
यावेळी अर्जुन जाधव यांनी दिग्दर्शित केलेले ‘महर्षी विश्वमित्र’ हे डोळ्याचे पारणे फेडणारे महानाट्य आश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी सादर केले. या महानाट्याने विद्यार्थ्यासह उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे हा संपुर्ण कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर यांनी सपत्नीक विद्यार्थ्यामध्ये बसुन पाहिला.
दरम्यान कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजयराव टुले, संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे, सेक्रेटरी नीलिमा गुणे, मुख्याध्यापिका योगिता दुकळे, आश्विन महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. सजीव लोखंडे, प्राचार्या डॉ. शामल निर्मळ, प्राचार्य डॉ. नितिन आहेर, डॉ. मोहन मोरे, अतुल खपके, संदीप हिरगळ, ईबिन के. व्हि. महेश हळनोर, चीफ अकाऊंटंट राजू बोंद्रे, हर्षदा भावसार, किसन हजारे, प्रवीण गाढे, सुनिल आढाव, सोन्याबापू वर्पे, गंगाधर चिधें, नितिन गिते, हौशिराम डमाळे, शीतल सांबरे, सुनिता गुंगले, शशिकांत गमे, पंडितराव डेंगळे, नानासाहेब वडीतके, सचिन भाकरे, प्रा. दत्ता शिंदे, डॉ. शिवपाल खंडीझोड, धनंजय देशमुख, रंगनाथ गिते, शशिकांत देशमुख, विजय वर्पे, सोपान राशीनकर, संजय शिंदे, विलास गायकवाड, प्रा. प्रदीप जगताप यांच्यासह संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सर्व छायाचित्रासाठी विशेष सहकार्य- भाऊसाहेब ताजणे