बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुरी येथे वह्यांचे वाटप

संगमनेर Live
0
बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुरी येथे वह्यांचे वाटप

◻️ लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल - विलास कवडे

संगमनेर LIVE | काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुरी दुमाला येथे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील १ हजार ५१५ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप वाटप करण्यात आले. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शिक्षण मंत्री पदाच्या काळात घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले असल्याचे प्रतिपादन यावेळी राजहंस दूध संघाचे संचालक विलास कवडे यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात माध्यमिक विद्यालय व नामदार बाळासाहेब थोरात ज्युनिअर कॉलेज नांदुरी दुमाला येथे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. साहेबराव कवडे, औद्योगिक वसाहतीचे माजी चेअरमन भाऊसाहेब एरंडे, शॅम्प्रोचे संचालक डी. एम. लांडगे, मुख्याध्यापक वामन यांच्यासह सर्व शिक्षक व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त कवडे परिवाराकडून साहेबराव कवडे यांनी नांदुरी दुमाला येथील माध्यमिक प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे छायाचित्र असलेल्या १ हजार ५१५ फुलस्केप वह्यांचे वाटप केले.

यावेळी बोलताना विलास कवडे म्हणाले की, दुष्काळी संगमनेर तालुका ते राज्यातील विकसित संगमनेर तालुका हा बदल लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी घडून आणला आहे. पाईपलाईनचे जाळे निर्माण करण्याबरोबर संगमनेर तालुक्यातील सहकारी संस्था यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. याचबरोबर तालुक्यात शिक्षण व्यवस्था अत्यंत चांगली असून संगमनेर शहर हे आरोग्य सुविधेचे केंद्र ठरले आहे. दररोज ९ लाख लिटरपेक्षा जास्त दूध उत्पादन करणाऱ्या तालुक्यात दहा लाख पेक्षा जास्त अंडी उत्पादन होत आहे. आर्थिक समृद्धी बरोबर शिक्षणात ही मोठी प्रगती झाल्याने नागरिकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला आहे.

निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी देणाऱ्या लोकनेत्यांनी जनसामान्यांच्या विकासाकरता सातत्याने काम केले आहे. नांदुरी दुमाला मधील अनेक विकास विकास कामांसाठी त्यांनी मोठा निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

भाऊसाहेब एरंडे म्हणाले की, शैक्षणिक, सहकार, कृषी याबरोबर संगमनेर तालुक्याची आर्थिक बाजारपेठ समृद्ध झाली आहे ती लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे एमआयडीसी मधूनही १०० पेक्षा जास्त उद्योग सुरू असून यामुळे सुमारे पाच हजार लोकांना रोजगार मिळाले असल्याचे ते म्हणाले.

डी. एम. लांडगे म्हणाले की, माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेततळ्याची योजना आणली आणि डाळिंब उत्पादनामध्ये संगमनेर तालुका हा डाळिंबाचे आगर बनला आहे.

दरम्यान यावेळी प्राचार्य वामन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर, साहेबराव कवडे यांनी आभार मानले‌. यावेळी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !