संगमनेर येथे आयोजित युथोत्सवाला ७ हजार २९० तरुणाईची उपस्थिती

संगमनेर Live
0
संगमनेर येथे आयोजित युथोत्सवाला ७ हजार २९० तरुणाईची उपस्थिती

◻️ नोकरी मेळाव्यातून तरुणांना चांगली संधी - बाळासाहेब थोरात

◻️ बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये तरुणाईला नोकरीची संधी उपलब्ध करून देणार - सत्यजित तांबे 

◻️ ९१ आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये २ हजार १९ विद्यार्थ्याची झाली थेट निवड

संगमनेर LIVE | आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर येथे आय लव संगमनेर चळवळी अंतर्गत युथोत्सव नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जिल्हाभरातून ७ हजार २९० तरुणाईने सहभाग नोंदवला. यात ९१ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये २ हजार १९ विद्यार्थ्याची थेट नोकरीसाठी निवड झाली आहे.

या मेळाव्याला जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन युवकांनी जगामध्ये कुठेही जाण्याची तयारी ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करताना, हा नोकरी मेळावा तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी ठरणार असल्याचे गौरवोद्गार काढले.

यावेळी आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, हर्ष मालपाणी, प्रज्वल भळगट, किरण रहाणे आदीसह विविध कंपन्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच टाटा, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयटी कंपन्या यांसह एकूण ९१ कंपन्यांचे प्रतिनिधी हजर होते.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, आमदार सत्यजीत तांबे यांनी तरुणाईला नोकरी मिळून देण्यासाठी हा अत्यंत चांगला उपक्रम सुरु केला आहे. गुणवत्ता आणि शिक्षण असलेल्याना यामुळे चांगली संधी निर्माण झाली आहे. नोकरी व व्यवसायासाठी जगाच्या पाठीवर कोठेही जाण्याची मानसिकता आणि तयारी ठेवली तर यश हमखास मिळेल असे यावेळी म्हंटले आहे.

आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यामध्ये शिक्षणासह अत्यंत चांगल्या सुविधा निर्माण करण्यात आल्या. आज या मेळाव्यात जिल्हाभरातून ७ हजार पेक्षा जास्त युवक आले असून त्या सर्वाना नोकरी मिळून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल. ज्या विद्यार्थ्याची निवड होणार नाही, त्यांच्याकरता प्रशिक्षण देऊन पुन्हा नोकरीसाठी प्रयत्न केले जातील. यापुढील काळातही जगभरातील विविध कंपन्या संगमनेर मध्ये आणून विद्यार्थ्यांना नोकरीसाठी संधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. तर, नोकरीसाठी वर्षभर स्वतंत्र विभाग कार्यरत केला जाणार असल्याचे सांगितले.

डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या, संगमनेर हे शैक्षणिक हब झाले आहे. नाशिक - पुणे - मुंबई या मेट्रो शहरांच्या संगमनेर जवळ असल्याने यापुढील काळातही विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या येथे बोलावून युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे म्हटले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !