निमजच्या सरपंच सौ. अलका गिऱ्हे यांचा काँग्रेसला रामराम!
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
◻️ निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन न घेता सुरू असलेल्या मनमानी कारभाराला कंटाळून निर्णय घेतल्याचा दावा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील निमज ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अलका बंडू गिऱ्हे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.
निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन न घेता सुरू असलेल्या मनमानी कारभाराला व त्रासाला कंटाळून हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बादशहा गुंजाळ, माजी सरपंच गोरक्षनाथ डोंगरे, भाजप तालुका उपाध्यक्ष शशिकांत मतकर, शिवसेना गटप्रमुख अशोक डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष डोंगरे, धनराज गुंजाळ यांच्या पुढाकारातून सरपंच गिऱ्हे यांनी संदीप जाधव, सहादू डोंगरे, ज्ञानेश्वर मतकर, अशोक मतकर, वसंत मतकर, नवनाथ जाधव, कैलास बिबवे यांनी आमदार अमोल खताळ यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
माझे सरपंच पदाचे कार्यकाळात निमज गावाचा खरा खुरा विकास करण्यासाठी व राजकारण विरहित काम करण्यासाठी तुमच्या बरोबर काम करायचे आहे असे सांगून सौ. गिऱ्हे यांनी आमदार अमोल खताळ आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी सरपंच अलका गिऱ्हे यांचे पती, नवनाथ मेंगाल, संदीप जाधव, सहादू डोंगरे, अनिल मतकर, ज्ञानेश्वर मतकर, अशोक मतकर, वसंत मतकर, नवनाथ जाधव, कैलास बिबवे, भास्कर कासार, दादा पाटील डोंगरे, विकास मतकर, रवी शेटे, अनिल कासार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निमज ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून आज पर्यंत अडीच वर्षाच्या कालावधीत या ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंच चालवत आहे. त्यांनी मला जाणीवपूर्वक कुठल्याही निर्णयामध्ये सहभागी करून घेतले नाही. तसेच त्यांनी माझ्या सहीचा व शिक्क्यांचा गैरवापर केला आहे.
माझ्या सरपंच पदाच्या कालावधीत ग्रामपंचायतीत काही गैरव्यवहार झाला असेल तर त्यात आपला काहीही संबंध नाही. या सर्व कारभाराला उपसरपंच सर्वस्वी जबाबदार असतील. यापुढे मी आमदार अमोल खताळ व गावातील जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. आज माझे मनातील घुसमट दुर झाली. असल्याचे सुतोवाच सरपंच सौ. अलका गिऱ्हे यांनी केले.