जात पडताळणीसाठी ’एक खिडकी प्रणाली’ सुरू करा - पांडुरंग माने
◻️ आदिवासी, भटके विमुक्त जातीच्या नागरीकांना जातीचे दाखले मिळण्यात अडथळे
संगमनेर LIVE | आदिवासी, भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांना जातीचा दाखला आणि जात पडताळणी प्रक्रियेत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा पुराव्यांच्या अभावामुळे त्यांना मूलभूत अधिकार आणि शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत आहे.
त्यामुळे जात पडताळणी व नागरिकत्व पुराव्यासाठी ’एक खिडकी प्रणाली’ तातडीने सुरू करा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) विमुक्त जाती, भटक्या जमातीचे उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा विभागप्रमुख पांडुरंग माने यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली. तसेच २००८च्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे म्हटले आहे.
स्थानिक पुरावे व गृह चौकशीच्या आधारे जातीचे दाखले द्यावेत, जेणेकरून नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही. दरम्यान असा निर्णय झाल्यास लाखो आदिवासी आणि भटके विमुक्त बांधवांना जातीचा दाखला सहज आणि जलद मिळणार असल्याचे पांडुरंग माने यांनी कळवले आहे.