संगमनेर येथे लवकरच कौशल्य विकास केंद्र सुरू करणार - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
संगमनेर येथे लवकरच कौशल्य विकास केंद्र सुरू करणार - मंत्री विखे पाटील 

◻️ हिवरगाव पावसा येथे पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचा नागरी सत्कार

◻️ मागील अडीच वर्षात संगमनेर तालुक्यासाठी १२०० (बाराशे) कोटी रुपयांचा निधी

◻️ जलनायकांच्या ठेकेदारांनी पाणी पुरवठा योजनांचा निधी खिशात घातल्याची घणाघाती टिका 



संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी आ. अमोल खताळ यांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी सरकारच्या वतीने सर्व पाठबळ उभे केले जाईल. अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी दिली. तसेच औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक असलेलेल्या मनुष्यबळच्या प्रशिक्षणासाठी संगमनेर येथे लवकरचं कौशल्य विकास केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा केली.

तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थ आणि महायुतीच्यावतीने मंत्री विखे पाटील व संगमनेर तालुक्यचे आमदार अमोल खताळ यांचा  नागरी सत्कार सोहळ्याचे आयोध्या येथील श्री. श्री १००८ श्री. जगद्गुरू परमहंस आचार्य आणि महंत एकनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री विखे बोलत होते. भाजपाचे तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, डॉ. अशोक इथापे, विनोद गायकवाड, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, सुदाम सानप, संतोष रोहम, अशोक कानवडे, काशिनाथ पावसे, गणेश दवंगे, गणपत पावसे, सोमनाथ भालेराव, श्रीराज डेरे, शरद गोर्डे, सुभाष गडाख, सुजाता दवंगे, कविता पाटील, रऊफ शेख, केशव दवंगे, बाळासाहेब शेटे, गणेश पावसे आदि यावेळी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील युवकांच्या रोजगारासाठी तीन औद्योगिक वसाहतींना जागा उपलब्ध करून दिली आहे. संगमनेरला औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील असून, या संदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचे सुतोवाच करून औद्योगिक वसाहतीकरीता आवश्यक असलेल्या मनुष्यबळच्या प्रशिक्षणासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र तातडीने संगमनेर मध्ये सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

अनेक वर्षे या तालुक्यातील युवकांनी अन्याय सहन केला. त्यांना तालुक्यामध्ये परीवर्तन हवे होते. तालुक्यातील जनतेन मोठ्या विश्वासाने परीवर्तन घडवले आहे. राज्यात सर्वात मोठा विजय आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून महायुतीला मिळाला आहे. आमदार खताळ यांच्या विजयामध्ये लाडक्या बहीणींचा फार वाटा मोठा असल्याचे सांगून मंत्री विखे म्हणाले की, महायुती सरकारने अनेक योजना सुरू केल्या. निवडणुकीत दिलेली आश्वासन महायुती सरकार निश्चित पूर्ण करेल. ही लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते कोर्टामध्ये गेले होते. परंतु त्यांनाच या लाडक्या बहिणींनी घरी बसवले. असा खरमरीत टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

मागील अडीच वर्षात संगमनेर तालुक्यातील विकास काम आणि योजनांच्या माध्यमातून १२०० कोटी रुपयांचा निधी महायुती सरकारने दिला. एकट्या हिवरगाव पावसा गावाला १२ कोटी रूपयांचा निधी दिला असून, तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांची कामे मार्गी लावायची आहेत. महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प राज्या तील महायुती सरकराचा असून, या जिल्ह्यासाठी अतिरीक्त पाणी निर्माण करण्याचे शासानाचे धोरण आहे. अनेक वर्षे या तालुक्यात महीलांच्या डोक्यावरील हांडा उतरू शकला नाही. या तालुक्यातील जलनायकांच्या ठेकेदारांनीच पाणी पुरवठा योजनांचा निधी खिशात घातला. त्यांचा बंदोबस्त करण्याचा इशारा देवून साकूरच्या उपसा सिंचन योजने बरोबरच भोजापूर चारीचे काम पूर्ण करून जिरायत भागाला पाणी देणार असल्‍याचे मंत्री विखे यांनी यावेळी सांगितले.

निळवंडेचे पाणी आले असले तरी, त्या वितरीकांची कामे सुरू करण्याकडे जल संपदा विभागाचा प्राधान्यक्रम राहणार आहे. मध्यप्रदेश मधील मोहनपुरा या जलाशयाच्या धर्तीवर आपल्याकडेही पाइपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याचा विचार केला जात असून पीडीएन व्यवस्था समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

आमदार अमोल खताळ म्हणाले की, तालुक्यात जनतेने केलेल्या परीवर्तनानंतर खऱ्या अर्थाने विकास गंगा सुरू झाली आहे. तालुक्यातील दहशत संपली असल्याने इतिहासात प्रथमच सामान्य कुटुंबातील एक तरूण आमदार होवू शकला. ना. विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्याचा पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आश्वासित करून युवकांच्या रोजगारासाठी औद्योगिक वसाहतनिर्माण करणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

महंत एकनाथ महाराज म्हणाले की, आज तालुक्यात बदल झाला आहे. आता घाबरून चालणार नाही. सर्वच बाबतीत तालुक्यात सतांतर होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी हिंदूत्वचा मुद्दा घेतला, राज्यात परिवर्तन झाले. आता हिंदूत्ववादी म्हणून काम करायचे असून सत्‍ता गेल्यानंतर काहींना धर्म आठवला असल्याचा टोला त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला.

निळवंडे पाण्यापासून वंचित राहीलेल्या गावांना पाण्याचा लाभ मिळवून देण्याची मागणी प्रमोद राहणे यांनी यावेळी केली. 

विधानसभा निवडणुकीमध्ये शर्यतीचा पहीला टप्पा जिंकला आहे. अजून शर्यत जिंकायची असल्याने या तालुक्यात अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्‍यांच्‍याकडे चाळीस वर्ष सत्‍ता होती त्‍यांनी या गावासाठी दहा लाख रुपयांचा सुध्‍दा निधी दिला नाही. मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्‍या माध्‍यमातून तब्बल १२ कोटी रुपयांचा निधी या गावाला मिळाला असल्‍याचे भाजपचे उपाध्यक्ष गणेश दवंगे यांनी सांगितले. 

दरम्यान याप्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !