तो आला, त्यांनी पाहिलं आणि दुकान बंद पाहून निघुन गेला सुध्दा!
◻️ आश्वी बुद्रुक येथे थेट चिकणच्या दुकानाला भेट दिलेल्या बिबट्याचा विडीओ तुफान वायरल
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक परिसरातील शेतशिवारात राजरोसपणे फिरणारे बिबट्ये आता गावाच्यां शिवेलगत असलेल्या वाड्या वस्त्या वर येऊन शेतकऱ्यांचा पशुधनावर ताव मारत असल्याच्या घटना नियमित घडत असतात. मात्र नुकतीचं अजब घटना उघडकीस आली आहे. यामध्ये चक्क एक बिबट्या भक्ष्याच्या शोधात चिकणच्या (बॉयलर कोंबडीचे मटन दुकान) दुकानातून फेरफटका मारुन गेल्याचा विडीओ तुफान वायरल झाला आहे. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
आश्वी - दाढ रस्त्यानजीक अंनिस शेख यांचे चिकनचे दुकान आहे. यांचं दुकानावर सोमवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात एक बिबट्या आला होता. तो याठिकाणी सर्वत्र फेरफटका मारत असल्याचे सीसीटीवी कैमेऱ्यात कैद झाला आहे. आश्वी परिसरातील लोकवस्तीत देखील एक बिबट्या फिरत असल्याचे अनिल बंदावणे यांच्या सीसीटीव्हीत सेव झाला होता. आश्वी परिसरातील नागरीक पहाटे फिरण्यासाठी यांचं रस्त्याने प्रतापपूरच्या दिशेने जात असतात. त्यामुळे नागरीकावर हल्ला झाल्यास जीवितास धोका निर्माण होण्याची भीती नागरीकानी व्यक्त केली आहे.
त्यामुळे वनविभागाने या परिसरात पिजंरा लावुन बिबट्या जेरबंद करत नागरीकाची दहशतीतून मुक्तता करावी अशी मागणी प्रगतशील शेतकरी भगवानराव इलग, शिवाजीराव इलग, रवींद्र बालोटे, विनायकराव बालोटे, अनिस शेख, प्रभाकर निघुते, हरिभाऊ ताजणे, भाऊसाहेब ताजणे, अनिल बालोटे आदिसह परिसरातील स्थानिक नागरीकानी केली आहे.