अंभोरेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध - आमदार अमोल खताळ
◻️अंभोरे येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील अंभोरे गावातील वीज, पाणी, रस्त्याचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहिल. असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील अखंड हरिनाम सप्ताह आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली. त्यावेळी सप्ताह कमिटीच्या वतीने आमदार खताळ यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी अंभोरे गावातील वीज, पाणी, रस्त्याचे प्रश्न अत्यंत गंभीर झाले असल्याचे आ. अमोल खताळ यांचे निदर्शनास आणून दिले असता त्यांनी हे प्रश्न मार्गी लावु असे अश्वासित केले.
यापुढे अंभोरे गावच्या सर्वागीण विकासासाठी राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व मी नेहमी कटीबद्ध राहील, अध्यात्मिक, सामाजिक, कृषी अशा सर्वच क्षेत्रातील विविध कामे मार्गी लावणार आहेत असे असे आश्वासन दिले.
याप्रसंगी संपत गोविंद खेमनर, अनिल शिवराम खेमनर, अँड. संदीप जगनर, शिवाजी खेमनर, रावसाहेब रावजी, सोपान राधू खेमनर, उमा मारुती खेमनर, बाबुराव गवाजी खेमनर, नागेश भास्कर हळनर, देवराम पुणेकर, रमेश बलसाने, नकाजी कडनर, दीपक कडनर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सोलर पंपामुळे शेतीला दिवसा पाणी देणे शक्य होणार आसल्याने ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. असे मत आमदार अमोल खताळ यांनी याच गावातील प्रगतशील शेतकरी शरद शिवाजी खेमनर यांच्या शेतात मुख्यमंत्री सोलर कृषी पंपाचे उद्घाटन करून झाल्यानंतर केले आणि सोलर पंपासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन त्यांनी केले.