जवळे कडलग - वडगाव लांडगा रस्ता बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनचं
◻️ निवडून येऊन सहा महिने न झालेल्यांनी बाराशे कोटीचा निधी मिळवला कधी?
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी २०२५ मध्येच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून निधी मिळवला आहे. या योजनेमधूनच जवळे कडलग ते वडगाव लांडगा या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला होता. अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे व विष्णुपंत रहाटळ यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना कातोरे व रहाटळ म्हणाले की, संगमनेर तालुका हा विस्तार आणि मोठा आहे. या तालुक्यातील प्रत्येक गावातील वाडी वस्ती करता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मोठा निधी दिला आहे. सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण विकासातून संगमनेर तालुका हा प्रगतशील तालुक्यांमध्ये ओळखला जातो आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन मधून वडगाव लांडगा ते जवळे कडलग या रस्त्याकरता बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करून निधी मिळवला आहे. ज्या रस्त्यांची कामे करावयाची आहे. त्या सर्व रस्त्यांचा निधी हा थोरात यांनीच मिळवला आहे.
विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ यासाठी कोणताही निधी मिळवलेला नाही किंबहुना झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संगमनेर तालुक्यात काहीच निधी मिळाला नाही. असे पहिल्यांदा घडले आहे की, संगमनेर तालुक्याच्या विकास कामांकरता निधी मिळाला नाही.
खरे तर विद्यमान लोकप्रतिनिधी हे सत्ताधारी पक्षाचे आहे परंतु त्यांची त्या पक्षात काही चालत नाही. वडगाव लांडगा येथे येऊन बाराशे कोटींच्या विकास कामांची माहिती त्यांनी दिली. बाराशे कोटींचा निधी मिळवला कधी त्यामध्ये कामे कोणती आहेत हे मात्र कुणाला कळायला मार्ग नाही.
नवीन लोकप्रतिनिधींना निवडून येऊन अजून सहा महिने झाले नाही. तर, बाराशे कोटी मिळवले कधी किंवा कोणत्या योजनेतील मिळवले त्यांनी ते जनतेला सांगितले पाहिजे. विनाकारण दिशाभूल करू नये असेही रहाटळ यांनी म्हटले आहे.
रस्त्याच्या कामासाठी निधी हा थोराताकडून - डीएम लांडगे
लोकनेते बाळासाहेब थोरात हे सर्वांचे हक्काचे नेतृत्व आहे. वाडी वस्तीच्या विकास कामासाठी आम्ही त्यांच्याकडे हक्काने निधी मागतो. दिवाळीपूर्वी २०२४ मध्ये या कामासाठी त्यांनी निधी दिला आहे. त्यामुळे इतरांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न अरु नये असे ज्येष्ठ कार्यकर्ते डीएम लांडगे यांनी म्हटले आहे.