कालवे अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सहकार्य करा - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
कालवे अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सहकार्य करा - आमदार अमोल खताळ

◻️ जलसंपदा विभागाच्या जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचा शुभारंभ



संगमनेर LIVE | दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करत असताना संगमनेरच्या तहानलेल्या जनतेला पाणी मिळवून देण्यासाठी महायुती सरकार कटीबध्द आहे. यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचे बळकटीकरण होत आहे. जल व्यवस्थापन पंधरवड्याच्या निमित्ताने कालवे अतिक्रमण मुक्त करण्यासाठी तसेच नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.

जलसंपदा विभागाच्या वतीने संगमनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचा तसेच जलप्रतिज्ञा तसेच जनजागृती रथाचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सेवानिवृत्त अभियंता उत्तम निर्मळ, उर्ध्वप्रवरा प्रकल्प कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, उपविभागीय कृषी आधिकारी विलास गायकवाड, कपिल पवार, दिलीप शिंदे, वैभव लांडगे, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, हरिषचंद्र चकोर, कैलास कासार, रऊफ शेख, विनोद सुर्यवंशी, दिनेश फटांगरे, शरद गोर्डे याप्रसंगी उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख कामांचे निर्णय होत आहेत. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून या राज्याला दुष्काळमुक्त करणे हा संकल्प महायुती सरकारचा आहे. यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न सुरु केले आहे. पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी तुटीच्या खोऱ्यामध्ये वळविण्याचे माजी खासदार स्व. बाळासाहेब विखे यांनी पाहीलेले स्वप्न पुर्ण करण्याची संधी मंत्री विखे यांना मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

वर्षानुवर्षे या तालुक्यातील काही गावे अद्यापही पाण्यापासून वंचित आहेत. या गावांना पाणी मिळवून देण्यासाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपाययोजना सुरु केल्या असून, निळवंडेचे पाणी जसे लाभक्षेत्राला मिळाले त्याच पध्दतीने साकुर पठार भागातील गावांना ही पाणी मिळवून देण्याचा प्रयत्न राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आपण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

उपलब्ध असलेले पाणी जपून वापरणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या पंधरवड्याच्या उपक्रमात शेतकरी आणि युवकांनी सहभाग देण्याची गरज असून, जलसंपदा विभागाचे आधिकारी आपल्या गावात येणार असल्याने अनेक संमस्यांचे निराकरण करण्यास मोठी मदत होईल. कालव्यांवरील अतिक्रमन काढण्यासाठी तसेच पाणीपट्टी भरण्यासाठी सहकार्याची भूमिका ठेवली पाहीजे असे मत त्यांनी शेवटी व्यक्त केले.

दरम्यान पाण्याचा कार्यक्षमपणे वापर झाला पाहीजे. जलसंपदा विभागाच्या आधिकाऱ्यांनी शेतकऱ्याकडे गेले पाहीजे. एकमेकांच्या विश्वासाने पाण्याच्या समस्या निकाली निघतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे यांनी केले. पंधरा दिवसात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या पत्रकाचे विमोचन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !