संगमनेर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध!
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर सभासदांनी दाखवला पुन्हा विश्वास
◻️ कारखान्याच्या हिताकरता माघार घेतलेल्या सर्वाचे केले अभिनंदन
संगमनेर LIVE | माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची २०२५-३० या पंचवार्षिक कार्यकाळाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारांवर कारखान्यासह संगमनेरच्या सहकाराची वाटचाल सुरू आहे. सहकारातून ग्रामीण भागात सह शहरात समृद्धी निर्माण झाली असून संगमनेरचा सहकार हा देशासाठी मार्गदर्शक ठरला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर कारखाना निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते.
मात्र तालुक्यातील सभासद सर्वसामान्य नागरिक व जनतेने कायम लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला असून त्यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळाच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या आहेत.
सन २०२५-३० या पंचवार्षिक निवडणुकीत लोकशाही पद्धतीने तालुक्यातील १३३ सभासदांनी व पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले. मात्र सर्वांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी विकास मंडळांनी दिलेल्या उमेदवारांसाठी इतरांनी सुसंस्कृत राजकारणाची परंपरा कायम ठेवत आपले अर्ज मागे घेतले होते. विरोधकांनी ही एक तालुका एक परिवार ही परंपरा जपत आपले अर्ज मागे घेतले.
नूतन संचालक मंडळात सोसायटी मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे बिनविरोध निवडले आहे.
साकुर गटातून - इंद्रजीत अशोकराव खेमनर, सतीश चंद्रभान वर्पे, रामदास लक्ष्मण धुळगंड,
जोर्वे गटातून - इंद्रजीत पंडितराव थोरात, डॉ. तुषार दिनकर दिघे, विलास गंगाधर शिदें,
तळेगाव गटातून - संपतराव श्रीरंगराव गोडगे, रामनाथ बाळाजी कुटे, नवनाथ धोंडीबा आरगडे,
धांदरफळ गटातून - पांडुरंग दामोदर घुले, विजय रामनाथ राहणे, विनोद गणपत हासे,
अकोले जवळे गटातून - गुलाब सयाजी देशमुख, संतोष रखमा हासे, अरुण सोन्याबापू वाकचौरे,
अनुसूचित जाती जमाती मतदार संघामधून - योगेश निवृत्ती भालेराव
महिला राखीव मतदार संघामधून - सौ. लता बाबासाहेब गायकर व सौ. सुंदरबाई रावसाहेब डुबे,
भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघामधून - दिलीप श्रीहरी नागरे
इतर मागासवर्गीय मतदार संघामधून - अंकुश बाळासाहेब ताजणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमनेर विभागाचे प्रांत अधिकारी शैलेश हिंगे यांनी काम पाहिले.
या बिनविरोध संचालक मंडळाचे महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे, कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाबासाहेब ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, इंद्रजीत थोरात, शंकरराव खेमनर, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, सौ. अर्चनाताई बालोडे, सौ. प्रमिला अभंग, निखिल पापडेजा, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी शेतकरी विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कारखान्याच्या हिताकरता माघार घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन..
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना हा राज्यातील उत्कृष्ट कारखाना असून सर्व सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक व नागरिकांचा कारखान्यावर मोठा विश्वास आहे. कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम करताना तालुक्याच्या विकासात योगदान दिले आहे.
संचालक पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. हे सर्व कार्यकर्ते तोलामोलाचे आहेत. मात्र कारखान्याच्या व तालुक्याच्या हिताकरता माघार घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे व सभासदांचे मी मनापासून अभिनंदन करत आहे. चांगल्या राजकारणाची परंपरा या सर्वांनी जपली आहे. यापुढेही हीच समृद्ध वाटचाल ठेवून सर्वजण एकत्रित चांगले काम करतील अशी प्रतिक्रिया वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.