शहागड आणि वडाच्या विकासासाठी भरीव निधी आणणार - आमदार अमोल खताळ
◻️ पेमगिरी येथील मोरदारा पाझर तलाव व महाकाय वटवृक्षाची आमदार खताळ यांनी केली पाहणी
संगमनेर LIVE | छत्रपती शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शहागड आणि पर्यटकाचे आकर्षण ठरलेल्या पेमगिरीचा महाकाय वटवृक्ष परिसराचा विकास करण्यासाठी भरीव निधी आणणार अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी पेमगिरी ग्रामस्थांना दिली.
संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील शहागडाच्या विकासाबाबत आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळात सर्वप्रथमच मुद्दा उपस्थित करत विधानसभेचे लक्ष वेधले. त्याबद्दल प्रेमगिरी ग्रामस्थांच्या वतीने खताळ यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेचे रामभाऊ राहणे, भाजपचे दादाभाऊ गुंजाळ, अशोक कानवडे, दिलीप कोल्हे, अँड. ज्ञानेश्वर सहाने, रावसाहेब डुबे, माधव चव्हाण, साहेबराव वलवे, सोमनाथ कानवडे, रविंद्र देशमुख शैलेश फटांगरे, राजू डुबे, शरद डुबे, निखिल दीक्षित, दत्ता शेटे रविंद्र डुबे, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रा. रोहिदास डुबे, निलेश डुबे, संजय पावसे आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, या भागातील शहागड तसेच महा वटवृक्षाचा पर्यटन विकासात समावेश करण्यासाठी पर्यटन विकास मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे आपण पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. मोठ्या प्रमाणात निधी आणून या भागाचा विकास करणार असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.
पेमगिरी आणि परिसरातील वाड्यांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मोरदरावाडी पाझर तलावाच्या वरील व खालील शेतकऱ्यांशी समन्वय साधून त्यातून मार्ग काढला जाईल. तसेच या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरदरावाडी पाझर तलावाचा जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावून या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटीबद्ध राहू असा विश्वास त्यांनी उपस्थिताना दिला.
यावेळी जवाहरलाल नेहरू विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यानी स्वागतगीत गायले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पावसे यांनी केले व आभार अँड. ज्ञानदेव सहाणे यांनी मानले.
दरम्यान याप्रसंगी संपत दुबे, राजू कोल्हे, शरद नाना डुबे, विठ्ठल पावसे, उत्तम गपले, वाल्मीक कोल्हे, प्रा. रोहिदास कोल्हे, सखाराम शेटे, सुदर्शन शेटे, शिवाजी डुबे, भाऊसाहेब गडकरी, संपत महाराज डूबे, अप्पासाहेब गोडसे, कचरु गोडसे, शांताराम गोडसे, संजय आगिविले, दिलीप भुतांबरे, बबन भुतांबरे, उमाजीराजे नाईक तरुण मित्र मंडळ, येळुशी तरुण मित्र मंडळ, चंदनगड तरुण मित्र मंडळ, मोरदरा तरुण मित्र मंडळासह महायुतीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.