गुंजाळवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात
◻️ आमदार अमोल खताळ आणि नीलम खताळ यांच्या हस्ते दीपपूजन
संगमनेर LIVE | संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी येथील राहणे मळा या ठिकाणी सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचे दीप पूजन आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी निलम खताळ यांच्या हस्ते करून सप्ताह सुरुवात झाली.
शहराजवळ राहणेमळा येथील मारुती मंदिरामध्ये दिनांक ५ एप्रिल ते १२ एप्रिल असे सात दिवस चालणाऱ्या अखंड हरि नाम सप्ताहास भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झाली आहे. या सप्ताहात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे ही आयोजन करण्यात आले आहे.
या सात दिवसाच्या कार्यकाळात शिवशाहीर शरद महाराज ढवळे, भागवताचार्य प्रतीक्षा महाराज जाधव, भागवताचार्य ज्ञानेशकन्या गिरी, स्वरमूर्ती नंदकिशोर महाराज देवकर, डॉ. प्रवीण महाराज दुशिंग, स्वामी अरुणा नाथगिरी महाराज, विनोद मूर्ती, महेश आप्पा मडके यांचे कीर्तन होणार आहे. तसेच शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी अरुण महाराज दिघे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.
दरम्यान या धार्मिक सप्ताहाचा परिसरातील भाविकभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन परिसरातील नागरिकांनी केले आहे.