संगमनेर येथे उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन तरुणीवर डॉक्टरकडून अत्याचार
◻️ देवदूत म्हणवून घेणाऱ्या पांढरपेक्षा डॉक्टरचा घृणास्पद प्रकार
◻️ आरोपी डॉक्टरला पोलीसांनी नाशिक येथून घेतले ताब्यात ; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
संगमनेर LIVE | संगमनेर शहरातील डॉ. अमोल कर्पे यांनी त्यांच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर इमारतीच्या गच्चीवर नेवून अत्याचार केल्याची घृणास्पद घटना रविवार दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ४ ते ५ या वेळेत घडली. या नराधम डॉक्टरला पोलीसांनी नाशिक येथून ताब्यात घेतले असून याप्रकरणी अत्याचारित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर येथील महाविद्यालयात ४ एप्रिल रोजी येत असताना या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे तिने तिच्या मैत्रिणीला सांगितले. त्या मैत्रिणीने त्यांच्या वर्ग शिक्षक यांना फोन केला असता वर्ग शिक्षक यांनी डॉ. अमोल कर्पे यांच्या रुग्णालयात जाण्यास सांगितले.
त्यांनतर तिला ॲडमिट करण्यात आले. रविवारी ६ एप्रिल रोजी पहाटे ४ ते ५ या वेळेत डॉ. कर्पे याला ही मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील डॉ. कर्पे हा तिच्या बेडजवळ आला व तिला म्हणाला कि तुला बरे वाटत आहे काय? तेव्हा ती म्हणाली कि, मला बरे वाटत आहे. तेव्हा डॉ. कर्पे तिला म्हणाला कि तु जरा बाहेर ये, असे म्हणाल्यानंतर ती बाहेर गेली, नंतर ते तिला गच्चीवर घेवुन गेला.
त्यानंतर त्याने तिला बोलता बोलता मिठी मारल्यामुळे ती मुलगी ओरडली. तेव्हा डॉ. कर्पे म्हणाला कि ओरडु नको नाहीतर.. असे म्हटल्यानंतर ती रडायला लागली. तो म्हणाला कि, रडु नको असे म्हणुन त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर कोणाला काही एक सांगितले तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.
दरम्यान त्याच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम ६४ (२), (३), ६८ (डी), ३५१ (३) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) कलम ४, ६, ८, १२ प्रमाणे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, आरोपी डॉक्टरला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले असून संगमनेर पोलीसांचे एक पथक आणण्यासाठी रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.